संजीवनीच्या तीन प्राध्यापकांना पीएच. डी. प्रदान
संजीवनीच्या तीन प्राध्यापकांना पीएच. डी. प्रदान
संजीवनीच्या संशोधनपुरक वातावरणामुळे अनेक प्राध्यापक होताहेत उच्च शिक्षित
कोपरगांव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२५– संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापकांना दिपक पैठणकर व विशाल चौधरी आणि संजीवनी विद्यापीठाचे विश्वजीत कोकाटे यांनी सिव्हिल इंजिनिअरींग मधिल तीन वेगवेगळ्या विषयांवर ओरिएंटल विद्यापीठ, इंदूर येथे संशोधनात्मक प्रबंध सादर करून आपल्या प्रबंधांचे सादरीकरण केले. विद्यापीठाने तीघांचेही प्रबंध व सादरीकरण ग्राह्य धरून त्यांना पीच.डी. (विद्या वाचस्पती) ही पदवी बहाल केली. संजीवनी मधिल संशोधनास पुरक वातावरण व व्यवस्थापनाचे प्रोत्साहन या बाबींमुळे अनेक प्राद्यापक संशोधनात्मक कार्याकडे ओढत आहे व आपल्या ज्ञानात भर टाकुन उच्च शिक्षित होत आहे, अशी माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी डॉ. पैठणकर, डॉ. चौधरी व डॉ. कोकाटे यांचे अभिनंदन केले तर मॅॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनीही त्यांचे अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी संजीवनी विद्यापीठाच्या प्रो व्हाईस चांसलर डॉ. जे जेनेट, इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. ए.जी.ठाकुर, सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. ए.एस. सय्यद व रजिस्ट्रार वाय. ए. पवार उपस्थित होते.
डॉ. पैठणकर यांनी ‘ अॅन अप्रोच टू कॉस्ट इफेक्टिव ग्रेवाटर ट्रिटमेंट, उटिलायझेशन अँड मॅनेजमेंट’ या विषयावर प्रबंध सादर करून घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बाग, झाडी यांना पुन्हा वापरण्याच्या किफायतशिर पध्दतीचे स्पष्टीकरण दिले. डॉ. चौधरी यांनी ‘डिफ्लोराइडेशन ऑफ वाटर बाय युझिंग इन्नेट लो कॉस्ट मटेरिअल्स’ या विषयावर प्रबंध सादर करून पाण्यातील हानीकारक घटक फ्लोराइड हा कमी खर्चात आणि प्रभावी पध्दतीने काढुन टाकण्याचा मार्ग सुकर केला आहे. डॉ. कोकाटे यांनी ‘अॅन एक्सपिरीमेंटल स्टडी ऑन परफॉर्मन्स ऑफ राईस हस्क अॅष बेस्ड बॅक्टेरिअल कॉन्क्रिट’ या विषयावर संशोधन करून बांधकामासाठी टिकाऊ आणि पर्यावरणपुर्वक साहित्याचा वापर वाढीस लागेल असे अधोरेखित केले.