जिल्हा बँक असोसीएशन आयोजित सहकारी बँक संमेलन जल्लोषात संपन्न
जिल्हा बँक असोसीएशन आयोजित सहकारी बँक संमेलन जल्लोषात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १५ जानेवारी २०२५–अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनच्या वतीने शनिवार दि ११ जानेवारी व रविवार दि १२ जानेवारी रोजी दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन संगमनेर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले या संमेलनामध्ये बँकिंग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता ,परफॉर्मन्स बुस्टर ,इंटरनल ऑडिट ,इन्शुरन्स आदी विषयावर ज्ञानसत्र आयोजित केले होते.
या संमेलनाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य फेडरेशनचे अजय ब्रम्हेच्या, विश्वास ठाकूर, सहकार विभागातील कोरे साहेब, राजेंद्र वाकचौरे, असोसिएशनचे अध्यक्ष सात्येन मुंदडा , उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे,संमेलन समन्वयक सुधाकर जोशी, प्रकाश राठी, विश्वास ठाकूर , विजय बनकर अविनाश कुमार सिंग, सीए संजय राठी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारी बँका चालविणे अतिशय कठीण आहे असे सांगितले व आरबीआयच्या निर्देशनानुसार बँका चलीवली पाहिजे असे मार्गदर्शन केले. तसेच राज्य फेडरेशन चे अध्यक्ष ब्रम्हेचा यांनी अशा प्रकारचे संमेलन जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असल्यामुळे संमेलनाचे कौतुक केले. तर अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी प्रस्तावना केली व संमेलनाचा उद्देश सांगितला.
तर या प्रसंगी कर्मचाऱ्यांसाठी कॅरम, बॅडमिंटन ,गायन, अंताक्षरी, नोट काउंटिंग आदी स्पर्धा आयोजित केली होत्या या संमेलनामध्ये २२ सहकारी बँकांच्या प्रतिनिधींनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाज आभार प्रकाश राठी यांनी व्यक्त केले.