संगमनेर
संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती व रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या; आमदार सत्यजित तांबे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
संगमनेर तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती व रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या; आमदार सत्यजित तांबे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
संगमनेर विजय कापसे दि २९ जानेवारी २०२५– काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरता माजीमंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे. मात्र राजकीय हेतू ठेवून सत्ताधाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.