संगमनेर
सह्याद्री संस्थेतील आजी – माजी सेवकांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन
सह्याद्री संस्थेतील आजी – माजी सेवकांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन

संगमनेर विजय कापसे दि १ फेब्रुवारी २०२५– संगमनेर तालुक्यातील गुणवत्तेच्या बाबतीत नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असणाऱ्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांचा व यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा स्नेह मेळावा 5 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4.30 वा. भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी दिली.



