अमृतवाहिनी आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांची रस्सीखेच व विटी दांडू या पारंपारिक खेळामध्ये राज्यस्तरीय यश
अमृतवाहिनी आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांची रस्सीखेच व विटी दांडू या पारंपारिक खेळामध्ये राज्यस्तरीय यश

संगमनेर विजय कापसे दि १२ मार्च २०२५– श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३०० व्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा महाकुंभ-२०२५ जिल्हास्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे भरल्या होत्या. सदर खेळाच्या स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी आय.टी.आय. मधील विद्यार्थ्यांनी विटी दांडू, रस्सीखेच या सांघिक खेळामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पंजा लढवणे या खेळांमध्ये ढगे मयूर नानासाहेब या विद्यार्थ्यांने १०५ किलो या वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच दंड बैठक या स्पर्धेमध्ये लकी दीपक पारचे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला. व त्यांची निवड विभागीय पातळीवर करण्यात आली.


या यशस्वी खेळाडूंचे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा.आ. बाळासाहेब थोरात, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, विश्वस्त मा.आ.डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त विलासराव वर्षे, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, अकॅडमीक डायरेक्टर डॉ.जे. बी. गुरव, मॅनेजर व्ही.बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, अमृतवाहिनी एम.बी.ए.चे डायरेक्टर डॉ.बी.एम. लोंढे, अमृतवाहिनी आय.टी.आयचे प्राचार्य विलास भाटे यांनी अभिनंदन केले.

या खेळाडू विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी अमृतवाहिनी आय.टी.आय. चे सर्व स्टाफ, प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
