महात्मा फुले विद्यालयात छात्र सेवा समारंभ उत्साहात साजरा
शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील छात्रसेवेच्या विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित शिक्षण प्रसारक संस्थेचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय संगमनेर आणि बहुजन शिक्षण संघ संचलित महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घुलेवाडी यांच्या समिती हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सत्र सेवा गटाचे मार्गदर्शक प्रा ज्योती मेस्त्री, प्रा.कविता काटे, प्रा. दिलीप बांबळे, अनिल गोसावी, भाग्यश्री घोडे, मनीषा पवार, सुवर्ण वादक, पूजा हापसे, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांस आणि शाळेत विविध भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच वस्तीगृहातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. छात्र सेवा कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा गीत गायन स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. आणि या स्पर्धांचे बक्षिसांचे क्रमांक काढून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य घोडे सर तसेच शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होते.

छात्रसेवा गटाचे मार्गदर्शक प्रा.ज्योती मेस्त्री म्हणाले की, जीवनामध्ये अनेक चढ-उतार असून सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक अडचणीवर मात करता येते. शिक्षणामध्ये गरीबी श्रीमंती हा भेद नसून गुणवत्ता असेल तर तुम्ही यश नक्की मिळवू शकता तर कविता काटे म्हणाल्या की भावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेत त्यांना ज्ञान घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका वैष्णवी खोलम, प्रास्ताविक प्राध्यापक कविता काटे, बक्षीस वितरण वाचन भाग्यश्री घोडे, परिपाठ नियोजन संध्या कोटकर , तेजस्विनी डावरे, माळी पूजा शाबेरा, शेख हुमेरा शेख यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य भावे, दिलीप बांबळे, अनिल गोसावी तसेच विद्यार्थिनी शिक्षिका यांनी विशेष परिश्रम केले.