आपला जिल्हा

संजीवनीच्या ८ विद्यार्थ्यांना  किर्लोस्कर न्यूमॅटिक मध्ये निकालापूर्वीच नोकरी

संजीवनीच्या ८ विद्यार्थ्यांना  किर्लोस्कर न्यूमॅटिक मध्ये निकालापूर्वीच नोकरी

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजची आणखी एक अभिमानास्पद कामगिरी

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २७ फेब्रुवारी २०२६–  संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध प्रयत्नांना पुन्हा एकदा यशाची सुवर्णमुद्रा मिळाली आहे. मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील आठ होतकरू विद्यार्थ्यांची  त्यांचा अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच किर्लोस्कर न्यूमॅटीक, पुणे या देशातील नामांकित औद्योगिक कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला, प्रात्यक्षिक कौशल्यांना आणि उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीला मोठी दाद मिळाली आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रणव दिनकरपूरी गोसावी, अभिषेक  भाऊसाहेब गुजर, ऋद्राक्ष विलास माकुणे, तेजस संजय निकम, संकेत संजय निरगुडे, प्रतिक्षा राधाक्रिष्ण  सानप, साईराम जनार्दन जावळे व उमेश  गोरख चौधरी यांचा समावेश  आहे.

जाहिरात

    एकामागून एक नामांकित कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या सुवर्णसंधी देत असल्याने महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा ठसा अधिक ठळक होत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आकर्षक वेतनाच्या व प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करून देणारे संजीवनी कॉलेज हे शाश्वत, विश्वासार्ह आणि उद्योगाभिमुख शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय म्हणून उदयास आले आहे. पालकांनी टाकलेला विश्वास आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द यांचे हे यशस्वी फलित ठरत असून संजीवनीची प्रगतीची वाटचाल अधिक भक्कम होत असल्याचे या यशातून स्पष्ट झाले आहे.

जाहिरात


 मी येवला येथील एका भाजीपाला व्यापाऱ्याचा  मुलगा आहे. मी चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, हीच माझ्या आई-वडिलांची मनापासून इच्छा होती. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी कधीच कमी पडू दिले नाही. दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत नोकरीच्या संधींसाठी प्रसिद्ध असलेल्या संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज बद्दल ऐकून मी येथे प्रवेश घेतला आणि हा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात योग्य ठरला. मुलाखतीपूर्वी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आमची अत्यंत मनापासून तयारी करून घेतली. संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि तांत्रिक ज्ञान यामुळे माझ्यात मोठा बदल झाला. माझा अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट ‘प्रेशर व्हेसल डिझाईनिंग’ हा होता आणि त्यातून मिळालेल्या सखोल ज्ञानामुळे मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना मी ठामपणे उत्तरे देऊ शकलो. या महाविद्यालयाने मला केवळ नोकरीची संधीच दिली नाही, तर आयुष्याला शिस्त, मूल्ये आणि मोठी स्वप्ने पाहण्याची ताकद दिली. आज माझ्या हातात नोकरीचे पत्र आहे.संजिवनीमुळे माझेच नव्हे, तर माझ्या आई-वडिलांचेही स्वप्न पूर्ण झाले आहे.-तेजस निकम, विद्यार्थी

या सर्व विद्यार्थ्यांचे संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची सर्व टीम यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
कॉलेज लोगो

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे