आपला जिल्हा

कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी ई-गुलाबी रिक्षा माहिती मेळावा संपन्न

कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी ई-गुलाबी रिक्षा माहिती मेळावा संपन्न
या योजनेच्या अधिक माहिती साठी कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव व समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील यांच्या सोबत संपर्क साधावा
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २४ फेब्रुवारी २०२५महाराष्ट्र शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारातून सक्षम होण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजना राबविण्यात येत असून या योजनेची तळागाळातील महिलांना माहिती व्हावी या करीता कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या माहिती मेळाव्यास महिलांचा  उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

कोपरगाव नगरपालिकेच्या कार्यालयात ई रिक्षा योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी महिला बालविकास विभागाचे महिला बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत, महिला बालकल्याण विभागाचे विकास बागुल, सचिन विघे, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे अधिकारी कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव, समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील, सहयोगिनी हेमा तवरेज, महिला आर्थिक विकास महामंडळ कोपरगाव येथील व्यवस्थापक सविता परदेशी, अध्यक्ष उषा निकम, लाभार्थी महिला यासह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात

 उपस्थित अधिकाऱ्यांनी या मेळाव्यास आलेल्या सर्व महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, राज्य सरकारने राज्यातील सर्वच शहरांमध्ये महिलांसाठी  गुलाबी ई रिक्षा योजना सुरु केली असून महिलांना ई रिक्षा विकत घेण्यासाठी राज्य सरकार अनुदान देणार आहे, तसेच अर्थसाहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांमध्ये रोजगार करण्याची क्षमता असली तरी त्यांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याच दृष्टीने राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत शहरातील वय वर्ष १८ ते ४० वयोगटातील ज्यांचे आर्थिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे यासाठी शासनाने सुचित केल्या नुसार पात्र महिला धारकांना लाभ देताना ई गुलाबी रिक्षाच्या किमतीच्या २० टक्के अनुदान दिले जाईल तसेच बँकेमार्फत ७० टक्के कर्जाची तरतूद करून देण्यात येईल आणि लाभार्थ्यांनी १० टक्के सुरुवातीला रक्कम जमा करत या योजनेचा लाभ घेता येणार आहे तरी जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्वांनी केले आहे.

जाहिरात
या मेळाव्याचे प्रास्ताविक कोपरगाव नगरपरिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी ई-गुलाबी रिक्षाचे फायदे सांगत शासनाच्या विविध  योजना अंमलबजावणीसाठी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असून दीनदयाळ अंत्योदय योजना कक्षामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले तर उपस्थित सर्व महिला व अधिकाऱ्यांचे आभार समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील यांनी व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे