शिंदेंच्या कार्यकाळातील प्रभावी विक्रमी जनहिताच्या कामामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार : अजय बोरस्ते.
शिंदेंच्या कार्यकाळातील प्रभावी विक्रमी जनहिताच्या कामामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार : अजय बोरस्ते.

शिर्डी विजय कापसे दि २५ फेब्रुवारी २०२५: ज्यावेळी शिवसेना हिंदुहृदय सम्राटांच्या विचारांपासून दूर गेली तेंव्हा शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बंड झाले. त्याची परिणीती महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली २४ तास जनतेची सेवा, महाराष्ट्रातील महिला, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी असंख्य योजना दिल्या. त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान वाढला आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. आजही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या शिवसेनेचं सक्षम नेतृत्व शिंदे साहेबांकडेच जाते हे सिद्ध झाले असून त्यामुळे या शिवसेना परिवाराचे सदस्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुढे येत आहेत. शिवसैनिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन घर तेथे शिवसैनिक उभा करावा असे आवाहन शिवसेना सभासद नोंदणी संदर्भात सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथील विश्रामगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केले.







