आपला जिल्हा

कोपरगाव शहरातील युवकांनी एकत्र येत महाशिवरात्रीनिमित्त दूध व खिचडीचे केले वाटप

कोपरगाव शहरातील युवकांनी एकत्र येत महाशिवरात्रीनिमित्त दूध व खिचडीचे केले वाटप

कोपरगाव शहरातील युवकांनी एकत्र येत महाशिवरात्रीनिमित्त दूध व खिचडीचे केले वाटप

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २६ फेब्रुवारी २०२५कोपरगाव शहरात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सोन्या मारुती मंदिर, हनुमान जन्मोत्सव कमिटी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा कोपरगाव यांच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने भाविकांना दूध व खिचडी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या सामाजिक उपक्रमात शेकडो भक्तांनी सहभाग घेतला आणि गरजू लोकांना अन्नदान करून धर्मसेवेचा लाभ घेतला.

जाहिरात

या कार्यक्रमाचे आयोजन दत्तपार जुने गावठाण येथे करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिर परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी होती. भक्तांनी भगवान शिवाच्या दर्शनानंतर दूध आणि खिचडीचा प्रसाद स्वीकारला. अनेक स्वयंसेवकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

जाहिरात

पत्रकार अक्षय काळे निशांत झावरे, आशुतोष दळवी, तुषार म्हसे, अभिजीत दारुंटे, अमोल देवकर, मोनू दळवी, अक्षय लोणारी, श्री निकुंभ, राहुल पांडे, कार्तिक बागुल, सिद्धार्थ पांडे, साहिल दारुंटे, क्षितिज कानकुब्जी, आनंद जाधव यांनी सांगितले की, महाशिवरात्र ही केवळ धार्मिक सण नसून समाजसेवेचा संदेश देणारी संधी आहे. गरजू आणि भक्तांसाठी आम्ही हा उपक्रम दरवर्षी आयोजित करतो.

जाहिरात

स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणात असे सेवा कार्य घडावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे