संगमनेर

अमृतवाहिनी एमबीएच्या ५२ वि‌द्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे निवड

अमृतवाहिनी एमबीएच्या ५२ वि‌द्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे निवड

अमृतवाहिनी एमबीएच्या ५२ वि‌द्यार्थ्यांची निकालापूर्वीच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे निवड

जाहिरात कोल्हे

संगमनेर विजय कापसे दि १९ मार्च २०२५अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाच्या ५२ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे विविध कंपन्यांमध्ये आतापर्यंत निवड झाली आहे. या कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ते ७ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाचे संचालक डॉ.बी. एम. लौढे यांनी दिली.

जाहिरात आत्मा

शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमृतवाणी एमबीए महावि‌द्यालया‌द्वारे ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये नेहमीच मोलाचा वाटा उचललेला आहे. आत्तापर्यंत महावि‌द्यालयातून २५०० वि‌द्यार्थ्यांनी एमबीए पदवी संपादित केलेली असून त्यापैकी बहुतांश वि‌द्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च पदावर कार्यरत आहे. अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायम संलग्नित असून महावि‌द्यालयाने सर्वच क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा राखलेली आहे तसेच महाविद्यालयाने आय. एस. ओ. मानांकने प्राप्त केलेले असून सन २०२४ मध्ये महाविद्यालयाने युजीसी च्या नॅकचे ए “रोड मानांकन मिळवलेले आहे. महावि‌द्यालयास पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन केंद्रास मान्यता मिळालेली आहे. या संशोधन केंद्रात महावि‌द्यालयातील १० प्राध्यापक संशोधन मार्गदर्शक असून ३५ संशोधक विद्यार्थी पीएचडी करत आहेत

जाहिरात

अमृतवाहिनी एम.बी.ए. महावि‌द्यालय पुणे नाशिक हायवे जवळ स्वतंत्र कॅम्पस मध्ये वसलेले आहे महावि‌द्यालयात शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्यामध्ये स्वतंत्र इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, प्लेसमेंट कक्ष, संगणक विभाग, होस्टेल व मेस सुविधा आणि ग्रीन कॅम्पस इत्यादी सुविधा ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या निवड झालेल्या वि‌द्यार्थ्यांच्या कंपन्यांमध्ये अल्केम लॅबोरोटरीस लिमिटेड, सिप्ला लिमिटेड, होम्सफाय रियल्टी लिमिटेड जस्टडायल लिमिटेड डी मार्ट, लिवस्पेस इंडिया प्रा. लिमिटेड, सोलर स्केयर एनर्जी प्रा.लि., डेसीमल पॉइंट एनालिटिक्स प्रा. लिमिटेड, डेटा मॅटीक्स ग्लोबल सर्विसेज लिमिटेड, निवा बूपा, हेल्थ इन्सुरन्स डीसीबी बैंक यूनिकॉर्न इन्फो सोलूशन्स प्रा लि मालपाणी इंडस्ट्रीज, डीसीएम फिनिशिंग प्रा.लि., डीएसआर ग्रुप ऑफ कंपनीज एन यू टेक कपलिंग्स प्रा.लि., टीमलीज सर्विसेज लिमिटेड इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.

जाहिरात

अमृतवाहिनी एमबीए मध्ये केवळ पाठ्यक्रम अभ्यासक्रम न शिकवता वि‌द्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात व त्याचप्रमाणे नव उ‌द्योजक सुद्धा निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्लेटमेंटसाठी अमृतवाहिनी एमबीएच्या वतीने संचालक डॉ.बी. एम. लोंढे, प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक विजय थोरात व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

जाहिरात

या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, संचालक इंद्रजीत थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक  व्ही बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी. गुरव या सर्वानी एमबीए महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे