संगमनेर

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय अमृत फेस्ट २०२५ संपन्न; आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय अमृत फेस्ट २०२५ संपन्न; आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय अमृत फेस्ट २०२५ संपन्न; आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग
जाहिरात कोल्हे

संगमनेर विजय कापसे दि २२ मार्च २०२५माजी शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय अकरावा “अमृत-फेस्ट-२०२५” कार्यक्रम नुकताच मोठ्या  उत्साहात पार पडला. या फेस्टमध्ये यावर्षी राज्यभरातील ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, कॅड वॉर, कोड वॉर, ॲप्टिट्यूड टेस्ट, इलेक्ट्रॉनिक सर्किट मेकिंग, हॅकॅथॉन आणि बाईक वर्कशॉप यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता.

जाहिरात

या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख प्संस्थेचे डायरेक्टर अकॅडमिक प्रा. जे. बी. गुरव, प्राचार्य प्रा व्ही बी धुमाळ , उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे, मेकॅट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख प्रा. एन. बी. शिंदे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. एम. डब्ल्यू. इंगोले, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. एन. के. चौधरी, प्रथम वर्ष समन्वयक प्रा. जे. के. सातपुते, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. एम. बी. सातपुते, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

या कार्यक्रमात प्रोजेक्ट एक्झिबिशन (CM/IT Group) विभागात भोर अक्षय, मंडलिक ओंकार आणि गट, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, हिंगे श्रावणी, दळवी संस्कृती आणि गट, जय हिंद पॉलिटेक्निक, नारायणगाव, निर्मल श्रद्धा, कोल्हे साक्षी, गरड गायत्री आणि गट, प्रवरा पॉलिटेक्निक, लोणी तर प्रोजेक्ट एक्झिबिशन (EJ/ETX/EE/MK Group): विभागात आहेर आदित्य, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, चौधरी प्रीती, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, उगले जीवन सुदाम, व्हीआयपी वेल्हाळे तसेच प्रोजेक्ट एक्झिबिशन (ME/CE Group) विभागात राऊत प्रदीप नारायण आणि गट, के. के. वाघ पॉलिटेक्निक, नाशिक, मनसुके संकर्षण, कांबळे सुजय, कानडी वैभव, हिंगळे तुषार, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, जोशी यश आणि गट, प्रवरा पॉलिटेक्निक, लोणी तसेच कॅड वॉर विभागात जगदाळे सचिन विजय, अजित दादा पवार कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, श्रीरामपूर, कोटकर ओम सतीश, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, गुंजाळ गौरी संजय, प्रवरा पॉलिटेक्निक, लोणी आणि कोड वॉर विभागात पठाण कामरान अमजद, साबळे सपना नारायण, दहिफळे कृष्णा गोविंद अमृतवाहिनी पॉलिटेक्निक तसेच हॅकॅथॉन या विभागात दहिफळे कृष्णा, कानवडे ईश्वरी, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर, चौधरी श्रुती, देशमुख प्रज्ञा, गायकवाड श्रेयश, गीते स्वप्ना, जगताप संस्कृतीअमृतवाहिनी पॉलिटेक्निक आणि ॲप्टिट्यूड टेस्ट प्रकारात नवले जय दत्तात्रय, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, देशमुख प्रज्ञवर्धन, एमआयटी येवला, घुले प्रतीक दीपक, प्रवरा पॉलिटेक्निक, लोणी आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट मेकिंग प्रकारात पारधे प्रणव रमेश, येडके श्रावणी प्रमोद, झींगुर्डे सेजल मिनीनाथ, प्रवरा पॉलिटेक्निक, लोणी, डोमे जयेश संतोष, वाकचौरे यश उत्तम, रोडगे रोहित रवींद्र, अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, राजवळ विशाल अजित, भांड शाहूराजे राजेंद्र, पुजारी दीपक सोमनाथ, अशोक पॉलिटेक्निक, श्रीरामपूर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

जाहिरात

या कार्यक्रमाचे नियोजन “अमृत-फेस्ट-२०२५” चे मुख्य समन्वयक माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख प्रा. एन. के. चौधरी, स्टाफ प्रतिनिधी प्रा. जी. एल. बोराडे आणि प्रा. बी. बी. शिंदे, तसेच विविध समिती समन्वयक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही बी धुमाळ यांनी केले

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात  विश्वस्त मा. आ .डॉ. सुधीर तांबे विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल. शिंदे यांनी अभिनंदन केले आणि आयोजन समिती सदस्यांचे कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे