आपला जिल्हा

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचे ४६ विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचे ४६ विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र
भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचे 46 विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र
संगमनेर विजय कापसे दि ३ मे २०२५माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री विद्यालयाने सातत्याने गुणवत्ता पूर्ण शिक्षणातून आपला लौकिक निर्माण केला असून नुकतेच या विद्यालयाचे 46 विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले आहे.

जाहिरात
सन 2024 – 25 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीचे 23 विद्यार्थी पात्र झाले व इयत्ता आठवी चे 23 विद्यार्थी पात्र झाले. असे एकूण 46 विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र झाले.

इयत्ता पाचवी मध्ये वर्पे पार्थ प्रवीण हा विद्यार्थी 252 गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. तसेच इयत्ता आठवी मध्ये कु.गायकर ज्ञानेश्वरी तुषार ही विद्यार्थिनी 224 गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.

जाहिरात

या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा “1 मे महाराष्ट्र दिन “या दिवशी संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.सुधीरजी तांबे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

इयत्ता 5 वी च्या या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख शरद नवले  शेख ए डी ,श्रीम. माळी एस एम श्रीमती पठारे एस ए यांनी मार्गदर्शन केले होते….तसेच इयत्ता 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना श्रीम. सुवर्णा रहाणे .श्रीम.स्मिता भोर ,श्रीमती डेरे ,श्रीम. ताई वर्पे श्रीम.सुरेखा दिघे यांनी मार्गदर्शन केले आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी  संस्थेचे सह सेक्रेटरी विशिष्ट आचार्य .बाबुराव गवांदे तसेच भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य के.जी.खेमनर  बीएसटी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. कोल्हे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे पर्यवेक्षक डी एम पवार ,पर्यवेक्षिका श्रीम.रणशूर  सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्या.  वर्पे  आणि सर्व ज्येष्ठ शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना डॉ.तांबे म्हणाले की शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम असून गुणवत्ता पूर्ण शिक्षणाला आता पर्याय नाही. यासाठी शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये याबाबत आवड निर्माण केली पाहिजे. पालकांनीही मुलांना मोबाईल पेक्षा वाचनात आणि मैदानांची आवड लागेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्कॉलरशिप मधून अनेक विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी मोठी प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश गुंजाळ यांनी केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे