आपला जिल्हा

एस एस जी एम महाविद्यालयात सेंद्रिय शेतीविषयक तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

एस एस जी एम महाविद्यालयात सेंद्रिय शेतीविषयक तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

एस एस जी एम महाविद्यालयात सेंद्रिय शेतीविषयक तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि ३१ जानेवारी २०२६–  रयत शिक्षण संस्थेचे, श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव आणि  राष्ट्रीय सेवा योजना,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६,७,८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शेती व्यवस्थापन’ या विषयांतर्गत “युवक व युवतींची सेंद्रिय शेतीतून उद्योजकतेकडे वाटचाल”या विषयावर विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना, व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान व रोजगार संधी याविषयी सखोल जाणीव निर्माण करणे हा आहे.

जाहिरात

कार्यशाळेमध्ये “सेंद्रिय शेतीची संकल्पना व व्यवस्थापन” या विषयावर विविध  सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना तत्वे व शेती व्यवस्थापनातील भूमिका  तालुका कृषी अधिकारी  मनोज सोनवणे (कोपरगाव), सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक शेती व्यवस्थापन कौशल्य उप-कृषी अधिकारी  सुनील घारकर (पोहेगाव), सेंद्रिय शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पना ग्रामविकास अधिकारी  संजय दुशिंग (चांदेकसारे), सेंद्रिय शेतीतून उद्योजकता विकास संकल्पना व प्रक्रिया  बाळासाहेब खेमनर (संगमनेर ), सेंद्रिय शेती आधारित व्यवसाय मॉडेल्स  प्रशांत पुलाटे (राहाता),सेंद्रिय उत्पादनांचे विपणन ब्रँडिंग व बाजार व्यवस्थापन रवींद्र अबक (संवत्सर),सेंद्रिय शेती उद्योजकांसाठीच अर्थसाह्य कर्ज व सरकारी योजना अविनाश निर्मळ (कोपरगाव),यशस्वी सेंद्रिय शेती उद्योजकाचे अनुभव व केस स्टडीज –  दिलीप देशमुख (संगमनेर) सेंद्रिय शेतीत युवक व युवतीची भविष्यातील भूमिका व करियर संधी व करियर संधी  गणेश बिरद्वाडे (कोपरगाव) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

या कार्यशाळेत सेंद्रिय शेतीचे अर्थ व व्याप्ती, पारंपरिक व सेंद्रिय शेतीतील फरक, माती-पाणी व्यवस्थापन, जैविक खते व कीड नियंत्रण, उत्पादन नियोजन, आधुनिक साधने, ICT व मोबाइल अॅप्सचा वापर, तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच युवकांची भूमिका यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

जाहिरात

या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी, युवक, शेतकरी व सेंद्रिय शेतीत रुची असणाऱ्या सर्व घटकांनी घ्यावा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथकाका शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे