आपला जिल्हा

संगमनेरमध्ये सोमवारी प्रा.डॉ.शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’वर जाहीर व्याख्यान

संगमनेरमध्ये सोमवारी प्रा.डॉ.शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’वर जाहीर व्याख्यान

सत्यशोधक विचार मंचच्या वतीने आयोजन  

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ३ सप्टेंबर २०२६-  सत्यशोधक विचार मंचच्या वतीने महात्मा फुले द्विशताब्दी निमित्त जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेतील दहावे पुष्प प्रा.डॉ.शरद बाविस्कर यांच्या व्याख्यानाने गुंफले जाणार असून, ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे व्याख्यान सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता व्यापारी असोसिएशन हॉल, पडतानी कॉम्प्लेक्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, संगमनेर येथे होणार आहे.

जाहिरात

प्रा.डॉ.शरद बाविस्कर हे (JNU), नवी दिल्ली येथे २०१२ पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातून अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी शिक्षणाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात

ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या एका विद्यार्थ्याने संघर्ष, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर देशातील प्रतिष्ठित विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्त्याचे विचार ऐकण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्यशोधक विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे