शुक्राचार्य मंदिरात एसटी स्मार्ट कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शुक्राचार्य मंदिरात एसटी स्मार्ट कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ट्रस्ट चे माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या ६५ व्या वाढदिवस निमित्ताने एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन

Kopargaon vijay kapse दि १२ सप्टेंबर २०२६ : एसटी प्रवासातील विविध सवलतींचा लाभ पात्र नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, कोपरगाव तालुका व परम शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्ट चे माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या ६५ व्या वाढदिवस निमित्ताने एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन पत्रकार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्राचार्य मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास लाभार्थी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शुक्रवार दि ११ सप्टेंबर रोजी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव विनोद जवरे, राजेंद्र आव्हाड, कैलास आव्हाड, विकास शर्मा, गोरख आव्हाड, पत्रकार सोमनाथ डफाळ, पत्रकार महेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष विजय कापसे यांनी बाळासाहेब आव्हाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत, शासनाच्या एसटी स्मार्ट कार्ड योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तर माजी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी शासनाच्या या उपक्रमाची माहिती देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एसटी स्मार्ट कार्ड शिबिराचे कौतुक केले. सामान्य नागरिकांना या शिबिरामुळे मोठा लाभ होत असून, पात्र नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास शर्मा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सोमनाथ डफाळ यांनी मानले.







