साकरवाडीत १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

साकरवाडीत १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
साकरवाडीत १६ ते २३ सप्टेंबरदरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

Kopargaon vijay kapse दि १२ सप्टेंबर २०२६: कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी (वारी) येथे गोदावरी बायोरिफायनरीज लि. संचालित गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र गोदाधामचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना या भागवत कथेचे श्रवण करता येणार आहे.

दि. १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीबरोबरच जीवनमूल्ये, संस्कार, सदाचार आणि अध्यात्माचा संदेश या कथेतून भाविकांना मिळणार आहे. महंत रामगिरीजी महाराज यांच्या रसाळ व ओघवत्या वाणीतील निरूपणाचा लाभ घेण्यासाठी साकरवाडी तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आध्यात्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीमद् भागवत कथेतील ज्ञानामृताचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने संचालक सुहास गोडगे यांनी केले आहे.



