ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा— डॉ. अशोक गावित्रे

ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा— डॉ. अशोक गावित्रे
ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा— डॉ. अशोक गावित्रे

Kopargaon vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६ : सण-उत्सवांच्या काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजासोबत लेझर लाईटचा होणारा गैरवापर नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणासाठीही घातक ठरू शकतो. त्यामुळे उत्सव साजरे करताना ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईटच्या वापराबाबत असलेल्या नियमांची प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोपरगाव तालुका कार्यकारिणीने केली आहे.
सण-उत्सव हे आनंद, सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. मात्र, उत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने ध्वनी प्रदूषण करणे योग्य नाही. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच प्राणी-पक्ष्यांवर कर्णकर्कश आवाजाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

तसेच, बीआयएस मानकांचे उल्लंघन करून लेझर लाईटचा वापर केल्यास डोळ्यांना इजा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लेझर सिस्टीमचा वापरही नियमांनुसार आणि अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच बीआयएस कायदा, २०१६ नुसार आवश्यक परवानगीशिवाय साऊंड व लेझर सिस्टीमची विक्री, जोडणी अथवा उत्पादन करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे, कार्याध्यक्ष शिवराज दुशिंग, उपाध्यक्ष रामनाथ भुजाडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे मेजर मारुती कोपरे, युवा जागृती विभागाचे मेजर विनोद थोरात, प्रवीण आभाळे, वैज्ञानिक जाणीव विभागाचे राहुल आभाळे, व्यसनमुक्ती प्रबोधन विभागाचे किशोर शिंदे तसेच जिल्हा कार्यवाहक प्रा. दीपक शिरसाठ आदी उपस्थित होते.



