आपला जिल्हा

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीजबिले संपूर्ण माफ करा; कायमस्वरूपी मोफत वीज द्यावी -आ. विवेक कोल्हे

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीजबिले संपूर्ण माफ करा; कायमस्वरूपी मोफत वीज द्यावी -आ. विवेक कोल्हे
शेतकऱ्यांप्रमाणे १० टक्के अनुदानावर सौरपंप देण्याची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
Kopargaon vijay kapse दि २८ नोव्हेंबर २०२६-महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरी, बोअरवेल आणि विद्युत पंपांच्या वीजबिलांची संपूर्ण माफी करावी, तसेच या योजनांना कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. याशिवाय शेतकऱ्यांप्रमाणे केवळ १० टक्के अनुदानावर सौरपंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आ. विवेक कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जाहिरात
या निवेदनात आ.विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. त्यासाठी विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांतर्गत विहिरी, बोअरवेल आणि पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या योजनांच्या विद्युत पंपांच्या वीजबिलांचा मोठा आर्थिक भार ग्रामपंचायतींवर पडत आहे.ग्रामपंचायतींचे उत्पन्न मर्यादित असून, इतर मूलभूत नागरी सुविधांवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.

जाहिरात
त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांची वीजबिले नियमित भरणे शक्य होत नाही.परिणामी, वीजबिले थकीत राहून काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडून ग्रामीण नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, त्याची उपलब्धता सुनिश्चित करणे ही शासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांवरील वीजबिलांचा आर्थिक भार कमी करून या योजना अखंडित सुरू राहण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

जाहिरात
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतींनीदेखील वीजबिलांची संपूर्ण माफी, कायमस्वरूपी मोफत वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांप्रमाणे १० टक्के अनुदानावर सौरपंप उपलब्ध करून देण्याची मागणी आपल्याकडे केली असल्याचे आ. कोल्हे यांनी पत्रात म्हटले आहे.राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी ही सवलत लागू करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी विनंतीही आ. विवेक कोल्हे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे