कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या २१ जनावरांना पोलिसांनी दिले जीवनदान
कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या २१ जनावरांना पोलिसांनी दिले जीवनदान
शहर पोलिसांचे होत आहे कौतुक

कोपरगाव विजय कापसे दि १२ मे २०२५– राज्यात गोवंश जातीच्या जनावरांना विकण्यास अथवा त्यांची कत्तल करण्यासाठी मनाई असताना देखील राज्यभरात अनेक निर्दयी लोक हे कृत्य करताना मिळून येत असतात अशीच एक घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलिसांनी उघडकीस आणत तब्बल २१ गोवंश जातीच्या जनावरांना जीवनदान दिल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि १२ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातून येवला शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनोद रवींद्र मइनकर राहणार गल्ली नंबर ५ घड्याळ मस्जिद जवळ तालुका जिल्हा धुळे, गोरख कदम चव्हाण राहणार बिलदारी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर, सुनील गणेश चव्हाण राहणार बिलदारी नागत सायगवान तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर, नितीन हेमा राठोड बिलदारी सायगवन तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर, उमेश हेमा राठोड बिलदारी सायगवन तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर हे आपल्याकडे असलेल्या एमएच १८ बीजी ४४८९ या आयशर ट्रकमध्ये अत्यंत निर्दयपणे वागून चारापाण्याची व्यवस्था न करता २१ जनावरे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कत्तलीच्या उद्देशाने भरून घेऊन जात असताना मिळून आले असता

त्यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मयूर माणिक विधाते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर २५२/२०२५ अन्वये प्राण्यांना निर्देशपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०,३ व ११ (घ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करत आहे.





