आपला जिल्हा

शिंगणापूर येथील नारंदी नदीचा गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर

शिंगणापूर येथील नारंदी नदीचा गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर
शेतकऱ्यांना होणार अधिक लाभ
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ मे २०२५कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथून वाहणाऱ्या नारंदि नदीचा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्ट ऑफ लिव्हिग या एजन्सी मार्फत गाळ काढला जात असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती गावचे सरपंच डॉ विजय काळे व ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे यांनी दिली आहे.

जाहिरात
 सुरू असलेल्या नारंदी नदी गाळ काढण्याच्या कामास जलसंधारण विभागाच्या प्रमुख प्रतिभा खेमनर, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी भेट देत पाहणी केली असता याप्रसंगी सरपंच डॉ विजय काळे, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर,  जेष्ठ नेते राजू लोणारी, शाम संवत्सरकर, प्रशांत आढाव,  बाळासाहेब संवत्सरकर,  दत्तात्रय संवत्सरकर, ग्रामपंचायत  अधिकारी अविनाश पगारे आदी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी जलसंधारणाच्या प्रमुख खेमनर यांनी सदर नदीचा गाळ काढल्याने पात्र खोल होणार असून पुराचा धोका कमी होऊन भूगर्भाच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे तर कृषी अधिकारी सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या गाळमुक्त शिवार या योजनेत सर्व गावांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याचे आवाहन केले तर शिंगणापूर गावातील ग्रामस्थांनी नदीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे