जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांस राहाता पोलीस स्टेशनकडून अटक.
जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांस राहाता पोलीस स्टेशनकडून अटक.
जाहिरात
राहाता विजय कापसे दि २२ मे २०२५-दिनांक १५ मे २०२५ रोजी दुपारी २.३० वा चे सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी संकेत अनिल सापते वय २० वर्षे, धंदा-शिक्षण रा. सापतेवस्ती अस्तगाव ता राहाता जि अहिल्यानगर नवनाथ नगर, राहाता ते अस्तगाव जाणाऱ्या रोङने सुनिल भाउसाहेब नळे रा अस्तगाव यांचे वस्तीजवळ समोरुन अस्तगाव कडून प्लसर व फोरएकेस मोटार सायकलवर आलेले गणेश विलास कोळगे रा विशालनगर, राहाता, यश प्रदीप मोरे रा दहेगाव ता राहाता, ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम रा रांजणगाव रोड, राहाता, प्रशांत जनार्धन जाधव रा राहाता या सर्वानी मिळून मला रस्त्यात मोटार सायकल आडवी लावुन चाकूचा धाक दाखवुन मोबाईल व पैसे बळजबरीने चोरुन घेतले बाबत राहाता पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २२०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम- ३०९ (४), ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
जाहिरात
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्म तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी वरील गुन्ह्याचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यावरुन राहाता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी आरोपींचे दिलेले वर्णनावरून गोपनीय माहिती घेवून सदरचे गुन्हेगार हे राहाता परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती गोपणीय बातमीदाराकडुन मिळाल्याने त्यावरून राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, मपोसई कोमल कुमावत, पोहेकों जी.के. गडाख, पोकों ए. आर गवांदे, मपोना रुपाली राजगिरे असे राहाता परिसरात चितळी रोड येथे पाळत ठेवून सराईत गुन्हेगार गणेश बिलास कोळगे वय २५ वर्षे, रा. गौतमनगर ता. राहाता जि. अहिल्यानगर यास शिताफिने ताब्यात घेवून सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार यश प्रदीप मोरे वय २१ वर्षे, रा दहेगाव ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर, ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम रा रांजणगाव रोङ, राहाता, प्रशांत जनार्धन जाधव रा. राहाता यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.जाहिरात
यातील ताब्यात घेतलेला आरोपी गणेश विलास कोळगे यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक २४ मे २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. सदर आरोपी याचेकडेस गुन्ह्यात चोरलेल्या मुद्देमाला बाबत व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकली बाबत विचारपुस करुन पुढील तपास करीत आहोत. सदर आरोपीचे साथीदार यांचे नावे निष्यन्न करण्यात आले असुन पोलीस पथक कसोशिने शोध घेत असून सदर आरोपीतांकडून अश्या प्रकारे जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन सिन्नर जिल्हा नाशिक येथील गु.र.न १२०/२०२५ भा. न्या संहिता कलम १०३ (१), १४०(१),२३८,३(५) यामध्ये आरोपी नामे गणेश विलास कोळगे हा पाहीजे असलेला आरोपी असल्याची माहीती संबंधीत पोलीस स्टेशन येथुन प्राप्त झाली आहे.जाहिरात गौतम
तरी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण सोबत पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, मपोसई कोमल कुमावत, पोहेकाँ जी.के. गडाख, पोकों / ए. आर गवांदे मपोना रुपाली राजगिरे व पोहेकॉ सचिन धानड (अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर) आदी पथकाने कौतुकास्पद कामगिरी करत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.