आपला जिल्हा

आयुर्वेद हे भारताचे भूषण- राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड

आयुर्वेद हे भारताचे भूषण- राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड

सूर्यतेज संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात विशेष व्याख्यान

कोपरगाव विजय कापसे दि २० जुलै २०२५आयुर्वेद ही भारताची प्राचीन उपचार आणि जीवनशैली असून विश्वालाही भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व समजले आहे. ही बाब भारतासाठी भूषण असल्याचे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी एका व्याख्यानात सांगितले. सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात निरंतर क्षेत्रात कार्य सुरु आहे. यंदाचे सूर्यतेज संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहे. यात कोपरगांव येथील शाळांमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड यांचे “गिरवू आयुर्वेदाचे धडे” या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.

जाहिरात

या व्याख्यानाचे पहिले पुष्प रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथे गुफले. या प्रसंगी व्याख्याते राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड, आयुर्वेदाचार्य डॉ. रिद्धी आव्हाड, धर्मयोध्दा माजी खासदार भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाणच्या मार्गदर्शिका नानीसाहेब बडदे, सूर्यतेज सल्लागार प्रा. लताताई भामरे, प्राचार्या अनिता धनक, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, प्रा. माया रक्ताटे, प्रा. महेश थोरात, वर्षा जाधव, अनंत गोडसे, उपप्राचार्या उज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनिता पवार, प्रभाकर आभाळे, रयतच्या लाईफ वर्कर सुनिता वाबळे, सांस्कृतिक विभागाच्या माधवी हरिदास, कविता निकम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

जाहिरात

या प्रसंगी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु रामदास आव्हाड पुढे म्हणाले, आयुर्वेदाचे संशोधन काळानुसार सिध्द होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने “प्रकृती परिक्षण अभियान” राबवून आयुर्वेदशास्राविषयी जनजागृती करत आहेत. असे सांगत डॉ. आव्हाड पुढे म्हणाले, मानवी शरीरातील कफ, पित्त, वात यामुळे होणारे विकार टाळण्यासाठी आयुर्वेद पथ्याची जीवनशैली शिकवते. उपवास करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. मनुष्याने दिनचर्या, ऋतुचर्या आणि आहार संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे. काळाची गरज आयुर्वेद असणार आहे. उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन सूर्यनमस्कार, ओमकार उच्चार नियमित करण्याचे आवाहन केले. साधा, सात्विक आहार उत्तम आरोग्य ठेवतो. सणासुदीला पदार्थ फक्त सणासुदीला खाण्याचे सांगितले. संस्कृत भाषा अवगत करुन आयुर्वेदाचे ज्ञान आणि पदवी संपादन करण्यासाठी आवाहन केले.

जाहिरात

व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनीनी आयुर्वेदाशी निगडित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड, आयुर्वेदाचार्य डॉ. रिध्दी आव्हाड यांनी दिली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत स्वागतगीताने झाले. व्याख्यान दरम्यान डॉ. रामदास आव्हाड यांनी आयुर्वेद संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणा-या विद्यार्थिनींना भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. डॉ. रामदास आव्हाड यांनी कन्या आयुर्वेदाचार्य डॉ. रिध्दी आव्हाड वाढदिवसानिमित्त शाळेला सी. सी. टि. व्ही. करिता मदत केली.

जाहिरात

उपस्थितांचे स्वागत प्राचार्य अनिता धनक, पाहुण्यांचा परिचय अरुण बोरणारे यांनी केला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मनोहर म्हैसमाळे, वेणुगोपाल अकलोड यांचे सह सह शिक्षक व सूर्यतेज सदस्यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन ज्योती गायकवाड यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे