आपला जिल्हा

शिर्डीमध्ये होणार शिवपुराण कथा महोत्सव;  डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

शिर्डीमध्ये होणार शिवपुराण कथा महोत्सव; 
डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

शिर्डीमध्ये होणार शिवपुराण कथा महोत्सव; 
डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

जाहिरात

शिर्डी विजय कापसे दि १९ जुलै २०२५शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य दिव्य आशा अध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करण्यार असल्याचे डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

डॉ. सुजय विखे पाटील यांनी मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे सादर आमंत्रण दिले असून येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे होणार आहे.

जाहिरात

शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून,या कार्यक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रेरणा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी व अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनींनी सातत्याने विनंती केली होती की, शिवकथे सारखा अध्यात्मिक सोहळा आपल्या भूमीत व्हावा. या भक्ती भावाला प्रतिसाद देत डॉ सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला ५ लाख पेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार आहेत.

शिवकथा केवळ श्रवणाचा सोहळा नाही, तर आत्मशुद्धी आणि जीवनाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या पावन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे