आपला जिल्हा

कान्हेगाव येथे जपानुष्ठान सोहळ्याचे उत्साहात आयोजन

कान्हेगाव येथे जपानुष्ठान सोहळ्याचे उत्साहात आयोजन

कलियुगात पुण्यकर्मच महत्वाचे – परमानंदगिरी महाराज

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ मे २०२४पुण्य कर्मामुळे सुखाची प्राप्ती होते तर मुर्त्यू नंतर मोक्ष प्राप्त होतो. पापकर्मामुळे दुःख होते तर मुर्त्यु नंतर नर्काची प्राप्ती होते.त्यासाठी पुण्यकर्म करणे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील कान्हेगाव येथे जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या प्रवचन प्रसंगी ते भाविकांना उपदेश करतांना ते बोलत होते.

जाहिरात– पीटर इंग्लंड , कोपरगाव स्टोअरच्या GRAND ANNIVERSARY साठी आपणास खास आमंत्रण आणि यानिमित्त तुम्हाला एक खास ऑफर देत आहोत. आत्ताच भेट द्या आणि मिळवा प्रत्येक 1000 च्या खरेदीवर 500 ची सूट, संपर्क– ०२४२३-२९९२६१.पत्ता – अण्णाभाऊ साठे चौकाजवळ, येवला रोड, कोपरगाव.

जो जन्माला आला तो मरणार आहे. आपले मरण कोणालाही माहिती नाही ते फक्त काळाला माहिती आहे.आपण झोपतो पण काळ झोपत नाही. काळ आपली घडी घडीला वाट पाहत आहे की अजून किती वेळ राहिला.वेळ संपली की काळ जीवाला घेऊन जातो.जसा बोका अचानक उंदिराला घेऊन जातो तसा काळ आपल्या जिवाला घेऊन जातो.

जाहिरात

या जगात सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर परम्यातम्याला आपलसं करून घ्यावं लागतं.त्यासाठी काया,वाचा व मनाने पवित्र व्हावे लागते असा उपदेश महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांनी उपस्थित भाविकांना केला.

जाहिरात

सदर सत्संग प्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी कान्हेगाव, वारी, भोजडे ,रामवाडी, संवत्सर,धोत्रे,तळेगाव, अंदरसुल, सडे आदीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन काजळे,संदीप वाळुंज,बाळासाहेब काजळे,राजेंद्र सांगळे,वसंतराव भाकरे ॲड वाल्मीक काजळे, सुनील काजळे ,पत्रकार जनार्दन जगताप यांचेसह सर्व तरुण मंडळ,भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे