बेकिंग व्यवसाय महिलांचा आर्थिक उन्नतीसाठी सर्वोत्तम – ॲड रश्मी कडू
बेकिंग व्यवसाय महिलांचा आर्थिक उन्नतीसाठी सर्वोत्तम – ॲड रश्मी कडू
कोपरगाव विजय कापसे दि ४ जानेवारी २०२५– बेकरी व्यवसाय हा आजच्या आपल कुटुंब बघून आयुष्यात काही तरी करू पाहणाऱ्या गृहिनीच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन केक मेकींग शिबिर प्रसंगी कोपरगाव येथील प्रसिध्द रश्मीज बास्केटच्या संचालिका ॲड.रश्मी मनोज कडू यांनी रिलायन्स स्मार्ट सुपरस्टोर शिर्डी तर्फे आयोजित हुमन्स वेन्सडे या खास महिलांसाठी आयोजित खेळ, मनोरंजन व तज्ञांचे मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
आजच्या घरगुती गृहिणीच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळावे तसेच महिला आर्थिक स्तरावर सक्षम होऊन आपल्या संसारात हातभार लावता यावा म्हणून रिलायन्स स्मार्ट सुपरस्टोर तर्फे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी महिलांना स्वताचा घरगुती कमी खर्चात व्यवसाय सुरू करता यावा म्हणून केक मेकिंग शिबिर आयोजित करत उपस्थित महिलांना रश्मीज बास्केटच्या संचालिका ॲड रश्मी मनोज कडू यांनी केक बनविण्याचे मार्गदर्शन करत चविष्ट केक बनविण्यासाठी लागणाऱ्या योग्य त्या टिप्स तसेच कप केक आणि मावा केक बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत केक मार्केटिंगचे धडे दिले.