वंदे मातरम् गीतानं राजकारण धर्म आणि पंथाच्या पलिकडे जावून देशवासियांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला- पालकमंत्री ना. विखे पाटील
वंदे मातरम् गीतानं राजकारण धर्म आणि पंथाच्या पलिकडे जावून देशवासियांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला- पालकमंत्री ना. विखे पाटील
वंदे मातरम् गीतानं राजकारण धर्म आणि पंथाच्या पलिकडे जावून देशवासियांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला- पालकमंत्री ना. विखे पाटील
लोणी विजय कापसे दि ७ नोव्हेंबर २०२५– बंकीमचंद्र चॅटर्जी यांनी शब्दबध्द केलेले वंदे मातरम् आपल्या देशाचा वारसा आहे. या गीतानं राजकारण धर्म आणि पंथाच्या पलिकडे जावून देशवासियांच्या मनात भक्तिभाव निर्माण केल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सामुहीक वंदे मातरम् गायनाचा सोहळा प्रवरानगर येथील डॉ.धनंजय गाडगीळ सभागृहात संपन्न झाला. यानिमित्ताने नागरीक आणि विद्यार्थ्यांना स्वदेशीची शपथ देण्यात आली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ राठी, भाजपाचे अध्यक्ष अनिल मोहीते, विनायकराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्यासह उपस्थित हजारो विद्यार्थी आणि नागरीकांनी स्वदेशीच्या संकल्प पत्रावर स्वाक्षरी करून प्रतिज्ञापत्र सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहना प्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे १५० वे वर्ष साजरे होत असतानाच वंदे मातरम् गीतालाही १५० वर्ष पुर्ण व्हावीत हा मोठा योगायोग आहे. या गीताने स्वातंत्र्य संग्रामात स्पुलिंग फुंकले. देशवासिंयामध्ये नवी प्रेरणा निर्माण केली. या देशाला भेदभावाच्या पलिकडे नेवून राष्ट्राला एक स्वन्प पाहाण्याचे आवाहन केले. या वंदे मातरम् गीताने देशावासिंयामध्ये नवा दृ्ष्टीकोन निर्माण केला.

बंकीमचंद्र चॅटर्जी शब्दबध्द केलेल्या गीतामध्ये कित्येक दशकांनी सहन केलेल्या यातनांची काव्यात्मक अभिव्यक्ती आहे. नद्या, शेत आणि वा-याचे वर्णन या गीतामध्ये निसर्गालाच मातेची उपमा देवून, एक प्रकारे भारत मातेविषयी कृतज्ञतेची भावनाच निर्माण केली आहे. या गीताची प्रेरणा घेवूनच आपला भारत देश आज वेगवेगळ्या स्वरुपात पुढे जात असल्याचा अभिमान मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षा निमित्त देशवासियांना केलेल्या अवाहनानुसार सामुहिक वंदे मातरम् गायनाचे कार्यक्रम सर्व गावे आणि वाड्या वस्त्यावर आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.




