आत्मा मालिक मध्ये वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समूहगायन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ८ नोव्हेंबर २०२५– बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या वंदे मातरम या गीतास स्वतंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात ही अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतीक असून स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे या गीतास शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभरात या गीताचा वर्धापन दिन विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जाहिरात
आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील हॉलमध्ये सकाळी ठीक ९ वाजून ५० मिनिटांनी श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी समाधीस्थान बेट कोपरगाव येथील महंत रमेशगिरी महाराज व ओम गुरुदेव जंगली महाराज ट्रस्टचे ज्येष्ठ संत विवेकानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच वंदे मातरम या कार्यक्रमाच्या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास परितोष दरपेल तसेच तालुकास्तरीय समिती सदस्य बी.पी शिंदे, डॉ परशराम साबळे, संजय भन्साळी, घोडके एस.पी, डॉ.जिभाऊ मोरे, पत्रकार अनिल दीक्षित, विशाल मेहत्रे, अजिंक्य भन्साळी, वैशाली काळे, विजय बंब, सुधीर डागा, अक्षय गिरमे, आहेर आर.के, प्रा विशाल धारणगावकर, निलेश देवकर आदी समिती सदस्यासह आत्मा मालिक ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, विश्वस्त प्रकाश गिरमे, संत आशिष महाराज, संत राजानंद महाराज, आदी संत महंतासह विविध शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित वंदे मातरम या गीताचे सामूहिक एका सुरात गायन करण्यात आले.जाहिरात
या प्रसंगी उपस्थित असलेले कोपरगावचे तहसीलदार तथा वंदे मातरम समितीचे तालुकास्तरीय अध्यक्ष महेश सावंत, मुख्य वक्ते मयूर चोळके यांनी उपस्थित सर्वांना वंदे मातरम या गीताचे महत्त्व सांगितले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य निरंजन डांगे, प्रास्ताविक कोपरगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वैशाली कुरापटी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट कोकमठाण चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीराताई पटेल आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.