आपला जिल्हा

मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा सोनेवाडी ग्रामस्थानी आभार मानून केला सत्कार

मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा सोनेवाडी ग्रामस्थानी आभार मानून केला सत्कार
एम.आय.डी.सी मुळे सोनेवाडी परिसराचा विकास होणार- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ जुन २०२५सोनेवाडी परिसरातील २३६ एकर जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यापैकी १८१ एकर जमिनीवर कंपनीची उभारणी सुरू आहे. हे सर्व करत असताना नकाशातील रस्ता नामशेष झाला होता. शेतकऱ्यांची मोठी दळणवळणाची समस्या निर्माण झाली होती. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. गणेश राठोड यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन  शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून दिला.सोनेवाडी परिसरातील अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कोल्हे परिवार ग्रामस्थांसोबत आहे. एम.आय.डी.सी मुळे सोनेवाडी परिसराचा विकास होणार आहे त्या दृष्टीने शासन स्तरावर केलेले प्रयत्न सफल होत असल्याचा आनंद आहे असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभेच्या मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

जाहिरात
त्या सोनेवाडी येथील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांशी संवाद साधतना बोलत होत्या
यावेळी आप्पासाहेब जावळे, आनंदराव जावळे, निरंजन गुडघे, भिकाजी बोंडखळ, गणपत राऊत, बबलु जावळे,जनार्दन वायसे, राजेंद्र गोतिस अदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या अडचणी व ग्रामपंचायतीच्या विविध प्रकारच्या मागण्या ग्रामस्थांनी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या पुढे मांडल्या. नकाशात असलेला रस्ता मिळाला. आता ग्रामपंचायतीला व्यवसायीक कर मिळावा. सोनेवाडी परिसरातील तरुणांना प्राधान्याने नोकरीसाठी कंपनीत संधी उपलब्ध करून द्याव्यात. परिसरातील रस्ते पक्के करावे. एमआयडीसी परिसरात सोनेवाडीच्या बाजूने मेन गेट करावे. एमआयडीसी परिसराला सोनेवाडी नावाचा काही अंशी उल्लेख करावा अदी मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

जाहिरात
शेतकऱ्यांची कुठलीच आडवणुक होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे अशी सूचना कोल्हे यांनी केली होती. या सर्वांची दखल घेत मंगळवारी संध्याकाळी चार वाजता प्रादेशिक अधिकारी डॉ. गणेश राठोड यांच्या सूचनेनुसार अधिकारी फुलचंद कातकडे यांनी कंपनी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेत संरक्षण भिंतीपासून सहा मीटर रुंद व सावळीवहिर रांजणगाव देशमुख रोड ते गोदावरी उजवा कालव्यापर्यंत लांबीचा हा रस्ता लेआउट करत रस्त्याची सीमा कायम केली. यामुळे प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांचा रस्त्याचा मार्ग मार्गी लागला.यासाठी आ.स्नेहलताताई कोल्हे यांचा सोनेवाडी

जाहिरात गौतम

ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

सूत्रसंचालन निरंजन गुडघे यांनी केले तर आभार आप्पासाहेब जावळे यांनी मानले. कोल्हे यांच्या पाठपुराव्याने सोनेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. गणेश राठोड यांचे देखील आभार ग्रामस्थांनी मानले आहे.

जाहिरात
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतून एमआयडीसी होण्यासाठी हजारो स्वाक्षरी मोहीम राबवत मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या समवेत सरकारकडे केलेल्या प्रयत्नांचा लढा हा महत्वाचा ठरला असून प्रगतीच्या वाटा खुल्या होण्यासाठी कोल्हे यांचे प्रयत्नांना यावेळी उजाळा मिळाला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे