आपला जिल्हा

कोपरगाव दिवाळी हाट’मुळे कोपरगावकरांची दिवाळी सणाची खरेदी सोपी- पुष्पाताई काळे

कोपरगाव दिवाळी हाट’मुळे कोपरगावकरांची दिवाळी सणाची खरेदी सोपी- पुष्पाताई काळे

कोपरगाव दिवाळी हाट’मुळे कोपरगावकरांची दिवाळी सणाची खरेदी सोपी- पुष्पाताई काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० ऑक्टोबर २०२५ :- कोपरगाव दिवाळी हाट’ च्या माध्यमातून कोपरगावकरांना एकाच ठिकाणी दिवाळी सणाची सर्व प्रकारची खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पारंपरिक दिवे, पूजेचे साहित्य, फराळाचे तयार पदार्थ, हाताने तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू, तयार कपडे अशा अनेक उपयुक्त वस्तू येथे माफक दरात मिळत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सणाला खरेदीसाठी नागरीकांच्या चिंता दूर होवून ग्राहकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचण्यास मदत होत असून कोपरगाव दिवाळी हाट’ मुळे कोपरगावकरांची दिवाळी सणाची खरेदी सोपी झाली असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी केले.

जाहिरात

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात दरवर्षी प्रमाणे शुक्रवार (दि.१०) पासून तीन दिवस ‘कोपरगाव दिवाळी हाट’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘कोपरगाव दिवाळी हाट चे उदघाटन सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळा मार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मागील काही वर्षापासून नागरिकांना दिवाळीची खरेदी करणे सोयीस्करपणे करता यावी या उद्देशातून दिवाळीच्या खरेदीसाठी ‘कोपरगाव दिवाळी हाट’ हा खरेदी महोत्सव सुरु करण्यात आला. बचत गटाच्या स्थानिक महिलांनाउद्योजकांना आणि व्यावसायिकांना त्याचा उत्पादित माल विक्रीसाठी व्यासपीठ मिळावे व कोपरगावकरांना  दिवाळीची खरेदी करतांना त्रास होवू नये या दुहेरी उद्देशातून ‘कोपरगाव दिवाळी हाट’ सुरु केला. उच्च दर्जाचे साहित्य माफक दरात मिळत असल्यामुळे नागरीकांचा देखील दरवर्षी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे दरवर्षी आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. याहीवर्षी तीन दिवस चालणाऱ्या या ‘कोपरगाव दिवाळी हाट’ मध्ये खरेदी करून आपला दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन सौ.पुष्पाताई काळे यांनी याप्रसंगी केले.

जाहिरात

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरप्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्याबचत गटाच्या महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे