नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी- खासदार भाऊसाहेब वाकचौरे

रेल्वे मार्गासाठी मी संगमनेर अकोले तालुक्यातील जनतेसोबत

नाशिक पुणे रेल्वे संगमनेर मार्गाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी समवेत शिवसेनेचे अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर वरूनच गेली पाहिजे कारण यामुळे संगमनेर मधील व्यापार शिक्षण उद्योजकता वाढीस लागणार आहे याचबरोबर पुणे नाशिक मुंबई या सुवर्ण त्रिकोणावरील रेल्वे मार्गामुळे विकासाची गती वाढणार आहे.

2009 ते 14 या काळामध्ये. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत आम्ही या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2012 मध्ये या मार्गाला मंजुरी दिली. त्यावेळेस नारायणगाव येथील रेडिओचे दुर्बीण केंद्र असे कोणतेही कारण दिले नाही आणि जर असे असते तर त्याच वेळेस हे कारण द्यायला पाहिजे होते. त्यानंतर मागील काळात संगमनेर मधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या अनेक शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळावे आणि 19 फेब्रुवारी 2024 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये नाशिक पुणे रेल्वे शिर्डी मार्गावहून नेण्याची घोषणा केली.
यानंतर संगमनेर सह सर्वत्र असंतोष निर्माण झाला ही रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी याकरता आपण तातडीने पाठपुरावा केला याचबरोबर 20 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला या रेल्वे बाबत आपण लोकसभेमध्ये तीन वेळेस प्रश्न उपस्थित केला आहे यापुढेही या रेल्वे मार्गाचा पाठपुरावा करणार आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी रेल्वे मार्गासाठी उभारलेल्या जन आंदोलनात आपण सहभागी आहोत याचबरोबर आमदार सत्यजित तांबे संगमनेरचे व अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी राज्य अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला पाहिजे याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या मार्गासाठी विनंती केली पाहिजे राज्य आणि केंद्र मिळून आपण एकत्रित हा मार्ग संगमनेरवरूनच करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे झाली पाहिजे ही जनतेची भावना आहे आणि त्यासोबत आपण आहोत असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी म्हटले असून आपण सातत्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विविध प्रश्नांसंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केले आहे 2009 ते 14 या काळामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार मी होतो असेही ते म्हणाले.



