आपला जिल्हा
ध्रुवीकरण आणि मतचोरी हा भाजपचा अजेंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

ध्रुवीकरण आणि मतचोरी हा भाजपचा अजेंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर प्रतिनिधी दि ८ डिसेंबर २०२५– सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराचे राजकारण केले जात असून धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपचा मुख्य अजेंडा झाला आहे. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज उघडपणे धर्माचे राजकारण केले जात असून लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांनी यावेळी केले.







