सुरेगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त वही–पेन दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित
सुरेगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त वही–पेन दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित
सुरेगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त वही–पेन दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित

कोपरगाव विजय कापसे दि ८ डिसेंबर २०२५–महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत समाजातील शिक्षणप्रेम आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या “फुल-हार न आणता शैक्षणिक साहित्य दान करा” या सामाजिक आवाहनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर काही महिन्यातच खासदार शंकररावजी काळे यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारलेल्या स्मारकात दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिन मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव कमिटी, गौतमनगर यांच्या वतीने “हार-फुले नको आम्हाला; वह्या-पुस्तके द्या अभ्यासाला” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपक्रमाला नागरिकांनी मनापासून सहकार्य करत वह्या, पेन, पेन्सिल, वह्या-बॅगा, डायरी, जिओमेट्री बॉक्स, कलर पेन सेट यासह विविध स्टेशनरी साहित्य मोठ्या प्रमाणात जमा केले. दानदात्यांमध्ये स्थानिक व्यावसायिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच परिसरातील अनेक दानशूर नागरिक यांनी एकत्र येत समाजहिताची सुंदर परंपरा पुढे नेली. संकलित साहित्य परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य म्हणून लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथजी बोरनारे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रनशूर, तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले व अशा समाजभिमुख उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
यावेळी सुरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पडले. समाजहित, शिक्षण आणि समानतेचे डॉ. आंबेडकरांचे मूल्य जपण्यासाठी समिती पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादात रावसाहेब खरात, अक्षय पवार, मनोज साळवे, अजय निकम, भूषण साळवे, बाळू बाबुराव मेहेरखांब, बाळनाथ साळवे, दीपक सुरेश पाईक, कुमार त्रिभुवन, भगवान विष्णू खैरे, विशाल अरुण लोंढे, भरत कौशीराम मेहेरखांब, मीनल चंद्रशेखर गवळी (सरपंच, कोळगाव थडी), आर. एस. रिळ, बादशहा समिद शेख, अनिल भास्कर मेहेरखांब, मोतीराम दिनकर निकम, राजेंद्र धुमाळ (सेक्युरिटी अधिकारी), शेख मोहम्मद, बाबासाहेब सातोरे, महेश केशव निकम, राजेंद्र भंडारी (ग्रा.प. सदस्य), आनंद उबाळे, मोहनराव गायकवाड (मा. उपसरपंच), धनराज मेहेरखांब, प्रवीण ताराचंद मेहेरखांब (सर), प्रशांत शिवाजीराव वाबळे (पं.स. सदस्य), यशवंतराव निकम (तालुका अध्यक्ष – राष्ट्रवादी), महेंद्र गोविंद बनकर, सुभाष डोलारे, असित माणिक घेगडे, वाल्मीक केदारे, राजेंद्र के. रोजी मेहेरखांब (ग्रामपंचायत सदस्य), उत्तम मेहरखाब (सर), शशिकांत वाबळे (माजी सरपंच), सुनील भाऊ मोकळ (RPI ज्येष्ठ कार्यकर्ते), दिलीपराव शरमाळे (ग्रामपंचायत सदस्य), दीपकराव कदम (उपसरपंच), डॉ. आय. के. सय्यद (ग्रा.प. सदस्य), आशिष अंबादास मेहेरखांब, रावसाहेब केरू निकम, प्रवीण पंढरीनाथ निकम, भागवतराव कदम (सामाजिक कार्यकर्ते), प्रकाश पोपटराव रोकडे (मेजर), नरेंद्र ताराचंद गडवे, ऍड. बोलगमवार साहेब आणि खरात सर (सुशीलामाई काळे विद्यालय) यांनी शालेय साहित्याचे उदार दान करून सामाजिक एकोपा आणि शिक्षणविषयक बांधिलकीची सुंदर परंपरा जपली.




