आपला जिल्हा
सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

प्राचार्य प्रा. एस. एम. खेमनर यांनी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील विविध उपक्रमांचा आढावा अहवाल द्वारे सादर करत विद्यार्थी व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ.जयश्रीताई थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात केवळ अभ्यास नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक विकासालाही तितकेच महत्त्व असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ.सुधीरजी तांबे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनासारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विकासाबरोबरच समाजाशी आपली नाळ कायम जोडून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव सुमंतजी कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता व शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम असतो असे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधाकर जोशी साहेब यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून बँकिंग व्यवस्था समजावून घ्यावी तसेच शालेय स्तरावर सुद्धा एखादी बचत बँक सुरू करून विद्यार्थ्यांना मदत करता आली तर आपण सहकार्य करण्यास तयार आहोत असे नमूद केले. संस्थेचे संचालक प्रा.बाबा खरात सर यांनी आपल्या उगवत्या भाषणामध्ये कॉलेजच्या विविध उपक्रमांच कौतुक केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे कौतुक केले.
स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावर आधारित नृत्य, देशभक्तीपर गीते व विनोदी नाट्यछटा सादर केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. सुहास आहेर, नितीन अभंग, गणेश गुंजाळ, निखिल पापडेजा, यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एन. एस. गुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक बी. एस. कुटे, शिक्षक प्रतिनिधी जी. एल. गुंजाळ, शिक्षिका प्रतिनिधी जी. आर. काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी शीतल वाणी, सांस्कृतिक विभागप्रमुख एन. आर. जगताप, क्रीडा विभागप्रमुख बी. जी. शिंदे, प्रसिद्धी विभागप्रमुख जी. सी.भवर सर, लेखक भालेराव सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.