संजीवनी सैनिकी स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेजचे ब्रास बॅन्ड पथक देशात पश्चिम विभागातुन प्रथम

संजीवनी सैनिकी स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेजचे ब्रास बॅन्ड पथक देशात पश्चिम विभागातुन प्रथम
संजीवनी करणार राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व

कोपरगाव विजय कापसे दि ४ जानेवारी २०२६ : पश्चिम विभागीय राष्ट्रीय भव्य ब्रास बॅन्ड स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम सुरावटी आणि शिस्तबध्द सादरीकरण करून पहिल्या क्रमांक पटकावला. हे पथक आता प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ब्रास बॅन्ड स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी दिली.

ते म्हणाले, केंद्र सरकारचे शैक्षणीक मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण तसेच पुणे येथील राज्य शैक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिस्तबध्द आणि कलात्मक सादरीकरण करून संजीवनीच्या बॅण्ड पथकाने पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवीला. संजीवनीने सलग दुसऱ्या वर्षी ब्रास बॅन्ड स्पर्धेत राज्यात अव्वल असल्याचे यापूर्वी सिध्द केले. आता देश पातळीवरील पश्चिम विभागीय स्पर्धेत सुध्दा अव्वल स्थान पटकावले.

या स्पर्धेत पश्चिम विभागातुन महाराष्ट्र , गुजरात, गोवा, मध्य प्रदेश , राजस्थान, दादरा नगर हवेली, दीव दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सर्वोत्तम १५ संघांमधुन संजीवनीने हि विजयी मोहर उमटवली. संगीत शिक्षक महेश गुरव यांचे मार्गदर्शन या संघास लाभले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी विपुल दिपक वाघ याच्या नेतृत्वाखाली ३३ कलांकारांनी हि विजयी कामगीरी केली.संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे ,डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर यांनी या संघास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागातून पहिल्या क्रमांक पटकावणारा संजीवनीचा संघ देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेत पश्चिम विभागाचे नेतृत्व करणार आहे. सध्या या पथकाचा कसून सराव सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करण्यासाठी हा सराव सुरू आहे.
सुमित कोल्हे(विश्वस्त, संजीवनी शैक्षणीक संकुल) ः-



