आपला जिल्हा

गोदाकाठ महोत्सव बनला खरेदीचे केंद्र आणि समाजप्रबोधनाचे व्यासपीठ

गोदाकाठ महोत्सव बनला खरेदीचे केंद्र आणि समाजप्रबोधनाचे व्यासपीठ

गोदाकाठ महोत्सवातून भविष्यातील कलावंत घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य

गोदाकाठ महोत्सवाला सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांच्या गर्दीचा उंचांक

गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२६गोदाकाठ महोत्सवामुळे कोपरगाव शहरासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करण्याची संधी मिळाली असून सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक एकात्मतेचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बहुतांश महोत्सव हे केवळ करमणूक किंवा खरेदी-विक्रीपुरते मर्यादित असतात. मात्र गोदाकाठ महोत्सव हा या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी या दोन्हींचा समतोल साधणारा आदर्श उपक्रम ठरला आहे. या महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे गोदाकाठ महोत्सवात एकून ३५० स्टॉल्स लावण्यात आले असून प्रत्येक स्टॉल्सवर स्री शक्ती-ताकद लोकशक्तीची, बेटी बचाव-बेटी पढाव, वृक्ष वाचवा, पर्यावरणाचे रक्षण करा,शेतकरी जगवा, पाणी जपून वापरा असे विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहक फक्त वस्तूंची खरेदी करीत नव्हते तर त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीवही आत्मसात करत होते. त्यामुळे गोदाकाठ महोत्सव एकाच वेळी खरेदीचे केंद्र आणि समाजप्रबोधनाचे व्यासपीठ बनला हेच गोदाकाठ महोत्सवाचे खरे वैशिष्ट्य आहे.

जाहिरात

यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न मनी बाळगणाऱ्या बचत गटाच्या महिलांनी आपले छोटे-मोठे उद्योग सुरु केले असून त्यांनी उत्पादित केलेल्या तयार मालाला हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होवून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या ह्या उद्देशातून प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला तिसऱ्या दिवशीही कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आजवरच्या गर्दीचा उंचांक मोडीत निघाला असून गोदाकाठ महोत्सवाने सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांची विक्रमी गर्दी खेचून आणली. शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत गोदाकाठ महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे रविवारी गोदाकाठ महोत्सवाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

जाहिरात

गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, सहजपणे शहरातील नागरिकांपर्यत पोहोचले आहेत. हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची व या बाजारपेठेत आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले असून दरवर्षी बचत गटाच्या स्टॉल्सची संख्या वाढतांना दिसत आहे. शुक्रवार (दि.०९) पासून सुरु झालेल्या गोदाकाठ महोत्सवा कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गटांच्या महिलांनी आपले विविध प्रकारच्या तयार मालांचे एकून ३५ स्टॅाल्स लावले आहेतरविवारी बचत गटाच्या तयार मालाची खरेदी करण्यासाठी रविवारी नागरिकांची अक्षरश:  झुंबड उडाली होती तर ग्रामीण भागाच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळे खाऊगल्ली पाय ठेवायला जागा नव्हती. माजी आमदार अशोकराव काळे यांनी रविवारी गोदाकाठ महोत्सवाला भेट देवून प्रत्येक स्टॅाल्सला भेट दिली. तीन दिवसात झालेल्या व्यवसायाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते स्टॅाल्स धारकांना सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

गोदाकाठ महोत्सवात दररोज सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना आपले कला गुण सादर करण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला असल्याचे चित्र दिसून आले. या कार्यक्रमालाही नागरीकांची मोठी उपस्थिती लाभली. नृत्य, गायन, नाट्य, समूहगीत, लोककला तसेच देशभक्तीपर सादरीकरणांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे  दर्शन घडविले. अभ्यासासोबतच कला, संस्कृती आणि मूल्यशिक्षण यांचा समतोल साधण्याचे उल्लेखनीय काम या उपक्रमातून साध्य झाले असून विद्यार्थ्यांनी आपली कला प्रभावीपणे सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पालक, शिक्षक आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या बालकलाकारांचे कौतुक करत त्यांना दाद दिली. एकूणच गोदाकाठ महोत्सवातील शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम हे केवळ करमणुकीपुरते मर्यादित न राहता हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे, सांस्कृतिक जतनाचे आणि सामाजिक एकात्मतेचे प्रभावी माध्यम ठरले आहे. या कार्यक्रमांनी महोत्सवाला एक वेगळी ओळख दिली असून उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्याबरोबरच भविष्यातील कलावंत घडवण्याचे कार्यही गोदाकाठ महोत्सव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 .आशुतोष काळे यांनी गोदाकाठ महोत्सवात खाऊगल्लीमध्ये फेर फटका मारला त्यावेळी या पदार्थांची चव चाखण्याचा मोह ते आवरू शकले नाही. त्यांनी स्वतः खाद्यपदार्थ विकत घेऊन आस्वाद घेत बचत गटांच्या महिलांचा उत्साह वाढवला.गोदाकाठ महोत्स हा केवळ उत्सव नाही, तर महिलांच्या स्वप्नांना उभारी देणारा लोकचळवळीचा मंच आहे. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतांना त्यांच्या मेहनतीची,आत्मनिर्भरतेची आणि जिद्दीची चव अनुभवायला मिळाली. त्यांच्या हातची चव ही केवळ पदार्थांची नसून, कुटुंबाला आधार देणाऱ्या त्यांच्या कष्टांची गोडी आहे. त्यांच्या हातच्या पदार्थांमध्ये केवळ चव नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या माता-भगिनींची माया,आत्मनिर्भरतेचा आत्मविश्वास आणि कुटुंबासाठी झगडणाऱ्या आईच्या स्वप्नांची ऊब असून अशा महिलांचा उत्साह वाढवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.-.आशुतोष काळे.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे