आपला जिल्हा

शिरसगाव धुपे येथील कोरडे कुटुंबीयांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून मदत; आगीमध्ये दोन कुटुंबीयांचे घर उध्वस्त

शिरसगाव धुपे येथील कोरडे कुटुंबीयांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून मदत; आगीमध्ये दोन कुटुंबीयांचे घर उध्वस्त

यशोधन कडून गृहपयोगी साहित्यसह तातडीची मदत

संगमनेर विजय कापसे दि १४ जानेवारी २०२६डोंगर माथ्यावर असलेल्या शिरसगाव धुपे येथील अण्णासाहेब कोरडे व चंद्रभागा कोरडे या गरीब कुटुंबीयांच्या घराला अचानक आग लागली या आदीमध्ये या दोन्ही कुटुंबातील गृह उपयोगी साहित्यसह संपूर्ण घर जळाले. हे कुटुंब उघड्यावर पडले ही माहिती मिळताच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीने दोन्ही कुटुंबीयांना तातडीची मदत देण्यात आली.

जाहिरात

यशोधन कार्यालयाचे प्रा. बाबा खरात व जनसेवक बाळकृष्ण गांडाळ गांडाळ यांनी तातडीची मदत घेऊन शिरसगाव धुपे येथील अण्णासाहेब कोरडे व चंद्रभागा कोरडे यांना मदत दिली. यावेळी समवेत माजी पंचायत समिती सदस्य गोपीनाथ भोजने उपसरपंच प्रवीण दिघे मंगेश धराडे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात

डोंगर माथ्यावर असलेल्या शिरसगाव धुपे येथील कोरडे कुटुंबीयांच्या घरांना आग लागली यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून राख झाले याची माहिती लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यंत्रणेला संबंधित कुटुंबाला मदत करण्याच्या तातडीच्या सूचना दिल्या. यानुसार यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा, ग्रहोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, कपडे अशा विविध वस्तू देण्यात आल्या.

जाहिरात

यावेळी बोलताना आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करताना तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवरील माणसाच्या विकासासाठी काम केले शिरसगाव धुपे हे त्यांचे अत्यंत प्रेमाचे गाव .या गावातील गरीब माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता या गावाला आदर्श बनवण्यासाठी त्यांनी काम केले. कोरडे कुटुंबीयांबाबत माहिती कळताच तातडीने मदत देण्याबरोबर संबंधित कुटुंबाला उभे करण्यासाठी यंत्रणेला सूचना दिले आहेत. प्रसंग येतात परंतु अशा कठीण प्रसंगी माणसाने खंबीर राहायला पाहिजे आणि अशा कठीण प्रसंगात लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम जनतेच्या पाठीशी राहिले आहेत.

तर बाळकृष्ण गांडाळ म्हणाले की गोरगरिबांच्या विकासासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम गोरगरीब माणसाची चिंता केली आहे. त्यांच्या विकासासाठी काम केले आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान असून कठीण प्रसंगी ते सुखदुःखात प्रत्येकाच्या सोबत असतात आणि त्यामुळे आमचे सर्व आदिवासी बांधव हे कायम त्यांच्या पाठीशी असून आम्ही एकनिष्ठ असल्याचे ते म्हणाले

तर अण्णासाहेब कोरडे म्हणाले की आमच्या घराला अचानक आग लागली. आज पाहून घरातील सर्व जण घाबरून गेले. डोळ्या देखत घरातील सर्व सामान जळून जात होते परंतु काही करता येत नव्हते .आम्ही गरीब माणसा आहोत. ही बातमी थोरात साहेबांपर्यंत गेली आणि साहेबांनी फोनवरून आम्हाला धीर दिला. याचबरोबर तातडीने मदत पाठवली. गरीबाच्या पाठीशी उभे राहणारे बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्यांचे व आमचे नेते आहेत

यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे