आपला जिल्हा

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली
अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली
संगमनेर विजय कापसे दि १४ जानेवारी २०२६ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने मागील 43 वर्षाची उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली असल्याची माहिती प्राचार्य प्रा.व्हि.बी.धुमाळ यांनी दिली आहे.

जाहिरात
नुकत्याच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून झालेल्या हिवाळी परीक्षेमध्ये सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून 43 वर्षांची परंपरा जपली आहे. यामध्ये कॉम्प्युटर विभागातून प्रथम वर्षात जाधव वेदांत विजय 90% गुण मिळून प्रथम तर द्वितीय वर्षामध्ये गोडसे यशराज राजेश यांनी 94 टक्के तर तृतीय वर्षात अनुजा कडलग हिने 97.6% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातून प्रथम वर्षात संस्कृती सुनील वाकचौरे हिने 90% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर द्वितीय वर्षांमध्ये ऋतुजा खतोडे हिने 94% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर तृतीय वर्षामध्ये सुयश भाऊसाहेब बोबले यांनी 96% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

जाहिरात

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातून प्रथम वर्षामध्ये साहिल नंदू लहामगे यांनी 88% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला तर गायत्री सोमनाथ भागवत हिने 93.41% गुण मिळून द्वितीय वर्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर तृतीय वर्षांमध्ये तनुजा आढाव हिने 93% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

जाहिरात

सिव्हिल विभागातून प्रथम वर्षात आव्हाड शितल काकासाहेब विने 85% गुण मिळून प्रथम क्रमांक तर द्वितीय वर्षांमध्ये राहुल हेमराज चौधरी यांनी 92 टक्के गुण मिळवले तर तृतीय वर्षामध्ये कृष्णराज मंडलिक यांनी 95% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

मेकेट्रॉनिक्स विभागातून हर्ष सचिन देशमुख यांनी 87% गुण मिळून प्रथम क्रमांक तर द्वितीय वर्षांमध्ये प्रदून्या गायकवाड हिने 91 टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर तृतीय वर्षांमध्ये अजिंक्य लक्ष्मण काळे यांनी 91% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला.

तर मेकॅनिकल विभागातून लांडे रुद्र योगेश याने 86% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय वर्षामध्ये दुबे ऋषी भीमाशंकर यांनी 91 टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आणि ओम लक्ष्मण काकड याने तृतीय वर्षांमध्ये 91% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ, उपप्राचार्य जी.बी.काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे