आपला जिल्हा

संतांच्या विचाराचा वारकरी संप्रदाय महत्त्वाचा –माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संतांच्या विचाराचा वारकरी संप्रदाय महत्त्वाचा –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
गुंजाळवाडी येथे काशीविश्वेश्वर स्वागत कमानीचे लोकार्पण काशीविश्वेश्वर देवस्थान मध्ये भक्तीचा सोहळा

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ११ फेब्रुवारी २०२६विविध संत आणि समाज सुधारक या सर्वांनी मानवतेचा धर्म सांगितला आहे. आणि वारकरी संप्रदायाचा पाया हा मानवता धर्म आहे. म्हणून समतेचा विचार सांगणारा वारकरी संप्रदाय हा मोठा समृद्ध परंपरेचा असून प्रत्येकाच्या जीवनात वारकरी संप्रदायाचे मोठे महत्त्व असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून गुंजाळवाडी येथील श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थानच्या वतीने उभारल्या भव्य कमानीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

जाहिरात

गुंजाळवाडी वेल्हाळे शिवावरील श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर मंदिर येथे लोक वर्गणीतून उभारलेल्या भव्य स्वागत कमानीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले यावेळी समवेत शिवभक्त बन्सी महाराज गुंजाळ,नवनाथ आरगडे, आर. एम. कातोरे अजय फटांगरे , सरपंच नरेंद्र गुंजाळ, उपसरपंच अमोल गुंजाळ, शिवाजी गुंजाळ, पंडित गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ ,एकनाथ गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, सुभाष गुंजाळ, दगू गुंजाळ ,बाळासाहेब गुंजाळ ,संजय गुंजाळ, नितीन गुंजाळ, अनिल गुंजाळ, अण्णासाहेब गोफने ,सुनील गुंजाळ ,वैभव गुंजाळ, मच्छिंद्र गुंजाळ ,सचिन गुंजाळ,  नितेश गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आय लव काशीविश्वेश्वर या डिजिटल फलकाचे लोकार्पणही केले.

जाहिरात

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे विविध जाती धर्मातील अनेक संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समानतेचा आणि मानवतेचा मंत्र दिला आहे. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक असून ही परंपरा आपण जपली आहे.

जाहिरात

संगमनेर तालुक्यामध्ये महादेवाचे निझर्णेश्वर ,खांडेश्वर, बाळेश्वर व दुधेश्वर ही तीर्थक्षेत्र असून या सर्वांच्या विकासासाठी आपण सातत्याने निधी दिला आहे याचबरोबर गुंजाळवाडी परिसरातील काशी विश्वेश्वर मंदिरासाठी ही सातत्याने निधी दिला असून सुशोभीकरणामुळे हा परिसर अत्यंत रमणीय झाला आहे. सर्वांच्या सहभागातून उभारलेली ही स्वागत कमान अत्यंत आकर्षक असून गावचे वैभव वाढवणारी आहे. शिवरात्रीच्या निमित्ताने अनेक शिवभक्त या परिसरात येत असून येथे होत असलेला हरिनाम सप्ताह पंचक्रोशीतील अनेक लोक उपस्थित राहून या धार्मिक कार्यात सहभागी होतात ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले

तर नवनाथ आरगडे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रत्येक गावच्या विकासासाठी मदत केली आहे. वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन जाणारे लोकनेते थोरात यांनी तालुक्यामधील विविध देवस्थानसाठी निधी दिला आहे. याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावातील सप्ताहामध्ये त्यांचे योगदान असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मंदिर देवस्थानचे शिवभक्त बन्सी महाराज गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले तर सरपंच नरेंद्र गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले व उपसरपंच अमोल गुंजाळ यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी गुंजाळवाडी वेल्हाळे घुलेवाडी परिसरातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे