आपला जिल्हा

कोल्हे  साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी मगर तर उपाध्यक्षपदी पगारे यांची निवड

 कोल्हे  साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी मगर तर उपाध्यक्षपदी पगारे यांची निवड
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुरेश मगर तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब पगारे यांची निवड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ फेब्रुवारी २०२६सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी सुरेश कोंडीराम मगर तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब वसंत पगारे यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
          अध्यक्षपदासाठी  सुरेश मगर यांच्या नावाची सुचना संचालक विलास कहांडळ यांनी मांडली तर त्यास सुदाम उगलमुगले यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी  आण्णासाहेब पगारे यांच्या नावाची सुचना संचालक साईनाथ तिपायले यांनी मांडली तर त्यास केशव बटवाल यांनी अनुमोदन दिले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कोपरगांव तालुका सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी  राजेंद्र रहाणे होते.

जाहिरात
         प्रारंभी व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करत नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला. सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष सुरेश मगर म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पंचक्रोशीतील उस उत्पादक सभासदांच्या उत्कर्षांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याची उभारणी केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी साखर कामगारांच्या अडी अडचणी समजुन घेत त्याची सोडवणुक केली. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी ही संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले. सर्व सभासद संचालक यांच्या सहकार्यातुन युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली साखर कामगार पतपेढीचा कारभार आदर्शवत करू असे उपाध्यक्ष आण्णासाहेब पगारे म्हणांले.

जाहिरात
यावेळी माजी अध्यक्ष उत्तमराव शेळके, माजी उपाध्यक्ष सुभाष होन यांचाही यावेळी सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, कामगार पतपेढीचे संचालक  देवराम देवकर, सुभाष होन आदि उपस्थित होते. यानिवडीबददल कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, कामगार नेते मनोहर शिंदे, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे आदिंनी अभिनंदन केले.  आभार व सुत्रसंचलन व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे