संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक परिवार आहे – आमदार विवेक कोल्हे

संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक परिवार आहे – आमदार विवेक कोल्हे
संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांचा सत्कार संपन्न

Kopargaon vijay kapse दि १ जुन २०२६- संजीवनी हा केवळ संस्थांचा समूह नसून एक मोठा परिवार आहे. संजीवनीचे माजी विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच संजीवनी शैक्षणिक संकुलाची खरी आणि यशस्वी ओळख आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित विविध संस्थांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, चिफ टेक्निकल आफिसर विजय नायडू व्यासपीठावर उपस्थित होते तर विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य, डीन, रजिस्ट्रार्स, पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी अमित कोल्हे यांनी आपल्या प्रास्तविक मनोगतात सांगीतले की आमदार विवेक कोल्हे यांची मेरीटवर विधान परिषदेवर निवड होणे ही बाब संपुर्ण संजीवनी परीवारासाठी अभिमानाची आहे. संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी युवकांना त्यांचे कर्तृत्व सिध्द करण्यासाठी आपल्या कारकिर्दीत व्यासपीठ दिले. त्याच विचारधारेतुन आमदार विवेक कोल्हे यांची आगेकुच सुरू आहे. आता आमदार कोल्हे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातुन ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला अधिक उर्जित अवस्थेमध्ये आणन्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व भविष्यात त्यांची कारकिर्द राष्ट्रीय स्तरावर पहायला मिळो, अशी शुभेच्छात्मक अपेक्षा व्यक्त केली.

आमदार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, मला मिळालेले यश हे केवळ माझे वैयक्तिक यश नसून संजीवनी परिवारातील प्रत्येक सदस्याचे यश आहे. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संजीवनीने सातत्याने केले आहे. शिक्षण क्षेत्रात स्व. शंकरराव कोल्हे यांची व्याप्ती मोठी होती. तळागाळात शिक्षण पोहचले पाहीजे, अशी त्यांची नेहमी अपेक्षा असायची. त्या अनुषंगाने संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्य महान आहे. संजीवनी शिक्षण संस्था ही फक्त शिक्षण देणारी संस्था नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला दिशा देणारी, त्याच्यातील क्षमता ओळखून त्याला घडविणारी संस्था आहे. आज जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले संजीवनीचे माजी विद्यार्थी या संस्थेच्या गुणवत्तेचे आणि संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत.यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. याचे उदाहरण देताना देत म्हणाले की एखादा इंजिनिअर चुकला तर त्याच्या हातुन निर्माण होणारे कार्य बाधित होवु शकते, एखादा डॉक्टर चुकलातर रूग्न बरा होवु शकत नाही, परंतु शिक्षक चुकला तर संपुर्ण पिढी बरबाद होवु शकते, म्हणुन शिक्षकांचे कार्य समाजासाठी महत्वपुर्ण आहे, व संजीवनीचे शिक्षक खऱ्या अर्थाने चांगले कार्य करत आहेत. माझी निवड ही विधान परिषदेवर आमदार म्हणुन झाली असुन कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रभर आहे. म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देण्याची भुमिका मी सभागृहात करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अघ्यक्षस्थानावरून बोलताना नितिनदादा म्हणाले की विवेकभैया यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून झालेली निवड ही विकास, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वाची निवड आहे.युवकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल, असे सांगुन त्यांनी आशिर्वादात्मक शुभेच्छा दिल्या. सर्वांनीच कार्यक्रमात उपस्थितांनी आमदार विवेक कोल्हे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी सार्वजनिक जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.



