आपला जिल्हा

संत कबीरांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी : प्राचार्य डॉ. विजय ठाणगे

संत कबीरांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी : प्राचार्य डॉ. विजय ठाणगे

संत कबीरांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी : प्राचार्य डॉ. विजय ठाणगे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६ : भारतभूमी ही संत आणि समाजसुधारकांची भूमी असून संत नामदेव, संत कबीर, संत रविदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. या परंपरेत संत कबीरांचे जीवन, कार्य आणि साहित्य आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत प्रेरणादायी आहे. सर्वधर्मसमभाव आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाचा संदेश देणारे संत कबीरांचे विचार विद्यार्थ्यांनी अभ्यासावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी केले.

जाहिरात

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या पदव्युत्तर हिंदी विभागाच्या वतीने आयोजित संत कबीर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. संत कबीरांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

जाहिरात

हिंदी विभागप्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी ‘संत कबीरांचे जीवन आणि कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करत त्यांच्या लोकप्रिय दोह्यांच्या माध्यमातून कबीरांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी संत कबीरांच्या निवडक दोह्यांचे गायन करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी केले. प्रा. किरण सोळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे