आपला जिल्हा

कासलीचा १३ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यास यश 

कासलीचा १३ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्यास यश 
दहेगाव बोलका उपकेंद्रांतर्गत दहा गावांतील ४ हजार ३८२ वीजग्राहकांना होणार लाभ
Kopargaon vijay kapse दि २७ ऑक्टोबर २०२६–कोपरगाव तालुक्यातील कासली येथे ४० एकर क्षेत्रात उभारण्यात आलेला १३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या फिडरसंदर्भातील अडचणी दूर करून तो लवकर सुरू करण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून, उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे.

जाहिरात
या सौर ऊर्जा प्रकल्पातून ११ केव्ही वीजवाहिनीद्वारे ३३/११ केव्ही दहेगाव बोलका उपकेंद्राला सौर वीज उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे दहेगाव बोलका उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या दहेगाव, कासली, लौकी, गोधेगाव, घोयेगाव, आपेगाव, तिळवणी, शिरसगाव, सवळगाव आणि उक्कडगाव या दहा गावांतील वीजग्राहकांना लाभ होणार आहे. या गावांमधील पाच कृषी फिडरद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठा केला जातो.या परिसरात एकूण ४ हजार ३८२ वीजग्राहक आहेत. यामध्ये २ हजार २०० कृषी पंप वीजग्राहक, २ हजार ३० घरगुती वीजग्राहक, ८९ व्यावसायिक वीजग्राहक, ३५ औद्योगिक वीजग्राहक आणि २८ इतर वीजग्राहकांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन परिसरातील कृषी वीजग्राहकांसह घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे.

जाहिरात
सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कृषी फिडरवरील वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे.

जाहिरात
कासली येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या फिडरसंदर्भातील अडचणी दूर करून प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली असून, लवकरच प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आ. विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
उक्कडगाव ए.जी. फीडर क्र. ६२ वरील अतिरिक्त विद्युत भार कमी करण्यासाठी नवीन १० कि.मी. लांबीची ११ के.व्ही. (HT) वीजवाहिनी उभारणे.
RDDS योजनेअंतर्गत नवीन वीजवाहिनी मंजूर करून स्वतंत्र फीडर सेपरेटर बसविणे.
सध्या फीडरवर सिंगल फेज व थ्री फेज वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार पडत असल्याने वारंवार ओव्हरलोडिंगची समस्या निर्माण होत आहे.त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होण्याची समस्या दूर करून शेतकरी व ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे यावर देखील आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही सुरू झालेली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे