आ.विवेक कोल्हे यांच्या हस्ते ४ कोटी ६ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
आ.विवेक कोल्हे यांच्या हस्ते ४ कोटी ६ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Kopargaon vijay kapse दि २८ ऑक्टोबर २०२६-कोपरगाव शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ४ कोटी ६ लक्ष निधीपैकी पहिल्या टप्प्यातील प्रभाग क्रमांक ४, ७, १० आणि १४ मधील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. या विकासकामांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, परिसराचे सुशोभीकरण आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आणि भूमिपूजन झालेल्या भागातील नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.जाहिरात
या विकासकामांमध्ये तुळजा भवानी मंदिर ते भुसारी मार्गाच्या विकासासाठी २६ लाख २५ हजार ९३२ रुपये, सप्तर्षी मळा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ८ लाख ४८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. किसन जाधव घर ते नंदू घोडेराव घर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ७ लाख ८६ हजार रुपये, बाळासाहेब पोकरे घर ते संजय माळी घर रस्त्यासाठी ७ लाख ९६ हजार ६०० रुपये, तर किशोर थोरात घर ते किसन जाधव घर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी १२ लाख ६७ हजार २०० रुपये खर्च अपेक्षित आहे. महाबली हनुमान मंदिर परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी १५ लाख ४०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.जाहिरात
तसेच वाबळे घर ते ढगारे घर या मार्गावर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १४ लाख ४५ हजार ९०० रुपये आणि श्रद्धानगरी परिसरातील ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ६ लाख ९२ हजार ३०० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुंदडा घर ते अजय क्लॉथ सेंटरपर्यंत भुयारी गटार बांधकामासाठी १४ लाख ९४ हजार ११८ रुपये, तर प्रभाग क्रमांक ७ मधील विविध ठिकाणी गटारी, नाले दुरुस्ती आणि पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लाख ९८ हजार ५१२ रुपये खर्च होणार आहेत.जाहिरात
शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देताना नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दर्जेदार रस्ते, प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन आणि सुधारित नागरी सुविधांमुळे संबंधित परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
आम्ही विश्वासनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम प्रामाणिकपणे करतो आहे.आगामी काळात वीस कोटी आणि आठ कोटी असे दोन टप्प्यात काही कामे प्रस्तावित आहे.प्रशासकीय काळात झालेला गैरकारभाराची गय न करता भ्रष्ट कारभार करण्याचा प्रयत्न कोणी केला तर अशा अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.गुणवत्ता पूर्ण काम होण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना केल्या असून टक्केवारी पद्धतीला आमच्याकडे थारा नाही त्यामुळे ठेकेदारांनी देखील काम गुणवत्ता राखून करावे असे आ. विवेक कोल्हे यांनी सांगितले.दीपावली नंतर नगरपालिका आपल्या दारी या भूमिकेतून नगराध्यक्ष व नगरसेवक अधिकाऱ्यांसह प्रभागात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी नागरिकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत सहकारी नगरसेवक सभापती यांच्या प्रामाणिक कामाचे कौतुक केले.नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळण्यासाठी दुष्काळी स्थिती असली तरीही बहुतांशी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.शेवटी आभार बांधकाम सभापती निलोफर पठाण यांनी मानले.