इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी अमृतनगर येथे अभिवादन
इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी अमृतनगर येथे अभिवादन
अमृत उद्योग समूहाच्या वतीने आयोजन; बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती

Sangmner vijay kapse दि २८ ऑक्टोबर २०२६ : भारताच्या माजी पंतप्रधान तथा ‘आयर्न लेडी’ स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता अमृतनगर येथील शक्तीस्थळावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती अमृत उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली.

याबाबत माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाच्या उभारणीत अत्यंत मोलाचे योगदान दिले. देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना त्यांनी अनेक धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये इंदिरा गांधी यांचे विशेष स्थान होते.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षी कारखाना कार्यस्थळावरील शक्तीस्थळ येथे इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन श्रद्धेने साजरा केला जातो. या निमित्ताने विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलक, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सौ. अर्चना बालोडे, सुरेश झावरे, निखिल पापडेजा, हैदर अली, गौरव डोंगरे, विश्वासराव मुर्तडक, गणपतराव सांगळे, प्रा. बाबा खरात, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, सौ. प्रमिला अभंग, सौ. निर्मलाताई गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या अभिवादन कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवक, नागरिक तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत उद्योग समूहाचे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.



