आपला जिल्हा
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची विटंबना; कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन


Kopargaon vijay kapse दि २० नोव्हेंबर २०२६– हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची शायना एन.सी. यांनी विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.






