पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Kopargaon vijay kapse दि २४ नोव्हेंबर २०२६ : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार (दि. २३) रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता, शिस्त आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास याबाबत पालक व शिक्षकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

सभेस उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे आणि के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठणगे उपस्थित होते. प्रा. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाकडे व नियमित उपस्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

डॉ. ठणगे यांनी पालक आणि शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड आणि कौशल्यांना योग्य दिशा दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे त्यांनी नमूद केले.यावेळी पालक श्री. राजगुरू यांनी महाविद्यालयाशी नियमित संवाद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली, तर श्रीमती देवकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअरविषयक संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, अशी सूचना केली. पालकांनीही विविध सूचना व अपेक्षा मांडल्या.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभा फलदायी ठरली. महाविद्यालय आणि पालक यांच्यातील दृढ सहकार्य हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रमुख साधन असल्याचा संदेश या सभेतून देण्यात आला.



