आपला जिल्हा

शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद
सहा विधानसभा मतदासंघातील हजारो शिवसैनिकांचा सहभाग; कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून संघटनात्मक बांधणीला बळ
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ नोव्हेंबर २०२६: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतींना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात दोन दिवस ही मुलाखत प्रक्रिया पार पडली. यावेळी सहा विधानसभा मदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी सहभाग नोंदवत संघटनात्मक काम करण्याची आपली इच्छा व्यक्त केली. मुलाखती दरम्यान झालेली गर्दी व कार्यकर्त्यांमधला असलेला उत्साह बघता शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या कार्यावरती कार्यकर्ते किती प्रभावित आहे हे दिसून आले.

जाहिरात
 मुलाखत प्रक्रियेसाठी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. ज्योतीताई वाघमारे, शिवसेना सचिव मा. भाऊसाहेब चौधरी व मा. राम रेपाळे उपस्थित होते. त्यांनी प्रत्येक इच्छुक शिवसैनिकाची वैयक्तिक मुलाखत घेत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. तसेच पक्षाप्रती असलेली निष्ठा, काम करण्याची क्षमता आणि संघटना वाढीसाठी असलेली तळमळ यांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

जाहिरात
शिवसेना ,महिला आघाडी व युवासेना या तिन्ही संघटनांमधील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा परिषद गटप्रमुख आणि पंचायत समिती गणप्रमुख या विविध पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधनसभा मतदरसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली.
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तरुण कार्यकर्ते व महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विशेषतः युवासेनेच्या पदांसाठी तरुणांचा मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मुलाखत प्रक्रियेमुळे शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

जाहिरात
शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील शिवसैनिक सातत्याने काम करत आहेत. पक्षाबद्दल असलेली निष्ठा, प्रेम, संघटनात्मक काम करण्याची क्षमता आणि सामाजिक योगदान या सर्व बाबींचा बारकाईने आढावा खासदार ज्योतीताई वाघमारे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व राम रेपाळे यांनी दोन दिवसांच्या मुलाखतीदरम्यान घेतला. पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि संघटनेशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच संधी मिळेल असे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व कमलाकर कोते यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे