परम शुक्राचार्य मंदिरात जल्लोषात साजरी होणार महाशिवरात्री; तर मंदिराच्या वेबसाईटचे लाँचींग

मंदिराच्या वेबसाईटचे लाँचींग सह शुक्राचार्य स्तवन, श्री शुक्र नित्य सेवा व शुक्रतीर्थ या पुस्तकाचे प्रकाशन

कोपरगाव विजय कापसे दि २३ फेब्रुवारी २०२५– हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव मिती माघ, कृष्ण अयोदशी शके १९४६ म्हणजेच बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी येत आहे. त्या संदर्भात मंदिराच्या विविध उपक्रमांची व तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही असे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी वसलेले संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेल्या परम सदगुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये ऑगस्ट २०२४ रोजी झालेला गुरू शुक्राचार्य महाराजांच्या सुंदर व पवित्र मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या व्यतिरिक्त मंदिराच्या इतर कामाबरोबरच नाशिक येथील राजेंद्र मुळे यांनी लिहीलेले शुक्राचार्य स्तवन या पुस्तीके बरोबरच ओंकार बाळासाहेब आव्हाड यांनी संकलीत केलेले हिन्दीतील श्री शुक्र नित्य सेवा हे पुस्तक व त्यांनी तयार केलेली गुरू शुक्राचार्य महाराज मंदिराची वेबसाईट www.

त्याचबरोबर सध्या प्रयागराज येथे सुरू असलेला १४४ वर्षानंतर आलेला महाकुंभनिमित्त व महाशिवरात्रीच्या दिवशी असलेले शेवटची पवित्र स्नानाची पर्वणी लक्षात घेता मंदिरामध्ये होणाऱ्या गर्दीचे नियोजन मंदिराची सजावट, मंदिरामध्ये होणाऱ्या पुजा व या पवित्र पर्वकाळानिमित्त भक्तांना अभिषेक करता यावा यासाठी प्रशासनाने नाममात्र दरात दिवसभर सामुदायीक अभिषेकाची सोय केलेली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य मंदिर प्रशासनामार्फत दिले जाणार आहे. मंदिरातील शिवपिंडीस चांदीचा मुलामा देण्यासाठी आपण भक्तांना आवाहन करीत असतो, त्याला प्रतिसाद म्हणून कालच कोपरगांव येथील प्रसिध्द व्यापारी कै. मोहनशेठ झंवर यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई झंवर व परिवारातर्फे सव्वा किलो चांदी शुक्राचार्य महाराजांच्या चरणी अर्पण केली आहे.

धरमवीर अजावाल यांचे सुपुत्र लाला दुर्गादासची मित्तल यांच्यातर्फे आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी महाशिवरात्री पर्वकाळात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संपूर्ण ट्रस्ट व मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

