आपला जिल्हा

के.जे. सोमैया महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन 

के.जे. सोमैया महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन 

के.जे. सोमैया महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२६के.जे. सोमैया महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व वाणिज्य शाखेच्या अंतर्गत बजाज बजाज फिन्सर्वच्या वतीने सीएसआर पुरस्कृत ची सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग,फायनान्स अँड इन्शुरन्सचे दिमाखात उद्घाटन झाल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी केले.

जाहिरात

 प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी असेंट फिनान्शिअल,नाशिकचे संचालक व प्रमुख प्रशिक्षक मा. विकास करंजीकर यांनी बजाज फिन्सर्वच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी अंतर्गत विविध महाविद्यालयातील युवा पिढीला शिक्षणासोबतच बँकिंग, फायनान्स व इन्शुरन्स क्षेत्रातील ज्ञान कौशल्य व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचे कामही दिले जाते. याविषयीचे स्पष्टीकरण केले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्याचे हे सलग तिसरे वर्ष असून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात यावर प्रकाशझोत त्यांनी टाकला.

जाहिरात

याप्रसंगी असेंट फिनान्शिअल, नाशिकचे संचालक व प्रमुख प्रशिक्षक मा. अश्विन निगुडकर यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाची भूमिका व विद्यार्थ्यांना दिलेली जाणारे प्रशिक्षण याविषयीचे सविस्तर विवेचन केले. तसेच प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासंदर्भात मोलाचे योगदान दिले. याप्रसंगी प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये गुणात्मक बदल कशाप्रकारे  घडून येतात याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना लाभार्थी विद्यार्थ्यांचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून दाखविले.

जाहिरात

वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) संतोष पगारे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी कसे लाभदायक आहे याविषयी मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रो. (डॉ.) रवींद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रो.(डॉ.) संजय अरगडे यांनी उपस्थित मान्यवर व प्रशिक्षकांचा परिचय करून दिला. प्रो.विजय सोमासे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  अशोकराव रोहमारे, सचिव  संजीव कुलकर्णी, विश्वस्त  संदीप रोहमारे तसेच रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे